गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७५ :
सोपवावयाचे अधिकार :
१) केंद्र सरकार, त्याला आवश्यक व योग्य वाटतील असे या अधिनियमाखालील अधिकार (नियम करावयाचे अधिकार वगळून) शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्या अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीवर अशा मर्यादांना अधीन राहून वापरण्यासाठी मंडळाकडे, इतर कोणत्याही प्राधिकरणाकडे किंवा गुंगीकारक औषधी द्रव्ये आयुक्ताकडे सोपवू शकेल.
२) राज्य सरकारला त्याला योग्य वाटतील व इष्ट वाटतील या अधिनियमाखालील त्याचे अधिकार व कर्तव्ये (नियम करण्याचे अधिकार वगळून) शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून अशा अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तींवर व अशा मर्यादांना अधीन राहून वापरण्यासाठी त्या राज्य शासनाच्या कोणत्याही प्राधिकरणाकडे किंवा अधिकाऱ्याकडे सोपवता येतील.
