गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-व्ही :
दोषांचे निराकरण :
अभिलेखांवरून उघडपणे दिसून येणारा दोष काढून टाकण्यासाठी सक्षम प्राधिकरणाला किंवा प्रकरणानुसार अपील न्यायाधिकारणाला त्याने काढलेला आदेश तो काढल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या कालावधीच्या आत सुधारता येईल.
परंतु, अशा कोणत्याही सुधारणेमुळे कोणत्याही व्यक्तीच्या न्याय्य हक्काला बाधा पोहोचणार असल्यास, अशा व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी देण्यात आल्याशिवाय अशी सुधारणा करण्यात येता कामा नये.
