गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-वाय :
या प्रकरणान्वये जिच्या संबंधात कार्यवाही करण्यात आलेली असेल अशी मालमत्ता संपादन करण्याबद्दल शास्ती :
कोणत्याही मालमत्तेच्या संबंधात या प्रकरणाखाली कार्यवाही प्रलंबित असताना कोणत्याही मार्गाने, जाणीवपूर्वक ती संपादन करणारी कोणतीही व्यक्ती, पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या कालावधीच्या कैदेच्या शिक्षेला, पन्नास हजार रूपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या दंडाच्या शिक्षेला, पात्र ठरेल.
