गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-क :
बेकायदेशीरपणष संपादीत मालमत्ता धारण करण्यावर प्रतिबंध :
१) या प्रकरणाच्या प्रारंभापासून असल्याप्रमाणे, ज्या व्यक्तीला हे प्रकरण लागू होते अशा कोणत्याही व्यक्तीने एकतर स्वत: किंवा तिच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीच्या मार्फत कोणतीही बेकायदेशीरपणे संपादित केलेली मालमत्ता धारण करता कामा नये.
२) पोटकलम (१) च्या तरतुदींचे उल्लंघन करून जर कोणतीही व्यक्ती कोणतीही बेकायदेशीरपणष संपादित केलेली मालमत्ता धारण करील अशा बाबतीत, या प्रकरणाच्या तरतुदींनुसार ती मालमत्ता केंद्र शासनाकडे जप्त करण्यास पात्र ठरेल.
परंतु ज्या व्यक्तीला हा अधिनियम लागू होतो तिने तिच्यावर बेकायदेशीर व्यापारासंबंधीचा आरोप करण्यात आल्याच्या तारखेपूर्वी (सहा वर्षे) अशी मालमत्ता संपादित केली असल्यास, अशा बाबतीत ती मालमत्ता सरकारजमा केली जाण्यास पात्र असणार नाही.
