गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-आर :
सक्षम प्राधिकरण आणि अपील न्यायाधिकरण यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असणे :
दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) याखालील दाव्यांची न्यायचौकशी करीत असताना सक्षम प्राधिकरणाला आणि अपील प्राधिकरणाला पुढील बाबतीत दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार असतील :
अ) एखाद्या व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी समन्स काढणे आणि तिच्या उपस्थितीची सक्ती करणे आणि त्याची शपथेवर तपासणी करणे,
ब) दस्तऐवज शोधून काढण्यास आणि सादर करण्यास फर्माविणे :
क) शपथेवर पुरावा स्वीकारणे
ड) कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून कोणत्याही सरकारी अभिलेखाची किंवा त्याच्या प्रतीची मागणी करणे;
ई) साक्षीदार किंवा दस्तऐवज यांच्या तपासणीसाठी राजादेश काढणे;
फ) विहित करण्यात येतील अशा इतर कोणत्याही बाबी.
