गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५७ :
अटक व जप्ती यांचा अहवाल सादर करणे :
कोणतीही व्यक्ती या अधिनियमान्वये कोणतीही अटक करील किंवा जप्ती करील, तेव्हा तिने अशी अटक किंवा जप्ती करण्यात आल्यापासून अठ्ठेचाळीस तासांच्या अशा अटकेचे किंवा जप्तीचे तपशील असलेला संपूर्ण अहवाल तयार केला पाहिजे व आपल्या तिकडच्या कार्यालयीन वरिष्ठ अधिकाऱ्याला सादर केला पाहिजे.
