गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ५३-अ :
१.(विशिष्ट परिस्थितीत केलेले निवेदन सुसंबद्ध असणे :
१) अपराधाच्या चौकशीसाठी कलम ५३ अन्वये अधिकार सोपवण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यासमोर, अशा अधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही चौकशीच्या किंवा कार्यवाहीच्या ओघात एखाद्या व्यक्तीने दिलेले व तिने स्वाक्षरी केलेले कोणतेही निवेदन या अधिनियमाखालील अपराधाच्या कोणत्याही खटल्यात त्यामध्ये अंतर्भूत असलेली वस्तुस्थिती सिद्ध करण्यासाठी पुढील बाबतीत सुसंबद्ध असेल-
अ) निवेदन देणारी व्यक्ती मरण पावली असेल किंवा ती सापडत नसेल किंवा ती पुरावा देण्यास असमर्थ झाली असेल किंवा विरोधी पक्षकाराने त्याला लपवून ठेवले असेल किंवा त्याच्या उपस्थितीसाठी बराच विलंब लागणार असेल किंवा खर्च होणार असेल आणि प्रकरणाची परिस्थिती विचारात घेता ते गैरवाजवी असल्याचे न्यायालयाचे मत असेल किंवा
ब) निवेदन देणाऱ्या व्यक्तीची न्यायालयासमोरील प्रकरणातील साक्षीदार म्हणून तपासणी करण्यात आली असेल आणि प्रकरणाची परिस्थिी विचारात घेता न्यायालयाचे असे मत असेल की, न्यायाच्या हिताच्या दृष्टीने निवेदन पुरावा म्हणून स्वीकारण्यात आले पाहिजे.
२) पोट कलम (१) च्या तरतुदी न्यायालयासमोरील कार्यवाहीच्या संबंधात जशा लागू होतात तशाच त्या या अधिनियमाखालील किंवा त्याखाली करण्यात आलेले नियम किंवा आदेश याखालील न्यायालयापुढील कार्यवाहीखेरीज अन्य कार्यवाहीच्या बाबतीत शक्य असेल तितपत लागू होतील.)
———
१. १९८९ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम १५ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
