Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ४२ : वॉरंट किंवा प्राधिकारपत्र याशिवाय प्रवेश करण्याचे, झडती घेण्याचे, जप्ती करण्याचे व अटक करण्याचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४२ :
वॉरंट किंवा प्राधिकारपत्र याशिवाय प्रवेश करण्याचे, झडती घेण्याचे, जप्ती करण्याचे व अटक करण्याचे अधिकार :
१) केंद्र शासनाने, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांद्वारे या बाबतीत अधिकार प्रदान केले असतील असा कोणताही (चपराशी, शिपाई किंवा हवालदार यांच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचा असलेला) सेंटड्ढल एक्साइज, गुंगीकारके, कस्टम, महसुली गुप्तवार्ता विभगाचा किंवा केंद्र शासनाचा किंवा सीमा सुरक्षा बळाच्या इतर कोणत्याही विभागाचा कोणताही अधिकारी किंवा राज्य शासनाने, विशेष किंवा सर्वसाधारण आदेशांद्वारे या बाबतीत अधिकार प्रदान केलेला कोणताही, (चपराशी, शिपाई किंवा हवालदार यांच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचा असलेला) महसूल, औषध नियंत्रण, एक्साइज किंवा पोलिस विभागाचा किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही विभागाचा अधिकारी, त्याच्या वैयक्तिक माहितीवरून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या आणि लेखी नमूद करून घेतलेल्या माहितीवरून ज्याच्या बाबतीत अन्वये शिक्षायोग्य असलेला असा अपराध करण्यात आलेला आहे, असे कोणतेही गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा अशा अपराधाचा पुरावा म्हणून सादर करता येतील, असे दस्तऐवज किंवा इतर वस्तू कोणत्याही इमातरीमध्ये, वाहनामध्ये किंवा बंदिस्त जागेत ठेवली आहे किंवा लपविली आहे. असे त्याला वाटण्यास कारण असल्यास, तो सूर्योद्य आणि सूर्यास्त यांच्या दरम्यानच्या काळात-
अ) अशी इमारत, वाहन किवा बंदिस्त जागा यांत प्रवेश करू शकेल व अशा कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकेल.
ब) अशा बाबतीत प्रतिकार झाल्यास कोणताही दरवाजा फोडू शकेल आणि प्रवेशासाठी असलेला अडथळा दूर करू शकेल.
क) असे औषधी द्रव्य किंवा पदार्थ आणि त्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेली सर्व सामग्री आणि या अधिनियमान्वये जप्त करण्यास पात्र आहे, असे त्याला सकारण वाटेल अशी इतर कोणतीही वस्तू आणि कोणताही प्राणी किंवा वाहन आणि असे औषधी द्रव्य किंवा पदार्थ यांच्या संबंधातील खाली शिक्षा करण्यास योग्य असेल, असा अपराध घडल्याचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्याला सकारण वाटेल, असा इतर दस्तऐवज किंवा इतर वस्तू जप्त करू शकेल; आणि
ड) अशा औषधी द्रव्याच्या किंवा पदार्थाच्या संबंधातील प्रकरण चार अन्वये शिक्षा होण्यास पात्र असलेला कोणताही अपराध जिने केला आहे असे त्याला सकारण वाटेल त्या कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करू शकेल व तिची झडती घेऊ शकेल आणि जर त्याला योग्य वाटल्यास तिला अटक करू शकेल.
१.(परंतु, उत्पादित औषधे किंवा सायकोटड्ढॉपिक पदार्थ किंवा या कायद्यान्वये मंजूर केलेल्या नियंत्रित पदार्थांच्या निर्मितीसाठी किंवा त्याखालील कोणताही नियम किंवा आदेश धारकाच्या संदर्भात, अशा अधिकाराचा वापर उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्याद्वारे केला जाईल :
परंतु आणखी असे) की झडतीचे वॉरंट किंवा प्राधिकारपत्र मिळवेपर्यंत पुरावा लपवून ठेवण्याची किंवा पळून जाण्याची संधी अपराध्याला मिळू शकेल, असे अशा अधिकाऱ्याला सकारण वाटत असेल, तर तो तसे वाटण्याची कारणे नमूद करून अशा इमारतीत, वाहनात किंवा बंदिस्त जागेत सूर्यास्तापासून सूर्योद्यापर्यंतच्या काळात कोणत्याही वेळी प्रवेश करू शकेल.
२) एखादा अधिकारी पोटकलम (१) अन्वये कोणतीही माहिती लेखी स्वरूपात घेईल किंवा त्याच्या परंतुकान्वये कोणत्याही विश्वासाची कारणे नमूद करील अशा बाबतीत, त्याने ताबडतोब त्याची एक प्रत आपल्या निकटच्या कार्यालयीन वरिष्ठाकडे ७२ तासाचे आत पाठवली पाहिजे.
——–
१. २०१४ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम १६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version