गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४० :
विशिष्ट अपराध्यांची नावे, व्यवसायाचे ठिकाण इत्यादी प्रसिद्ध करण्याचा न्यायालयाचा अधिकार :
१) एखाद्या व्यक्तीला कलमे १५ ते २५ (दोन्ही धरून), कलम २८, कलम २९ किंवा कलम ३० अन्वये शिक्षेस पात्र ठरेल असा अपराध करण्याबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल अशा बाबतीत दोषी ठरविणारे न्यायालय अशा व्यक्तीच्या व्यवसायाचे किंवा निवासस्थानाचे नाव व ठिकाण, शर्तभंगाचे स्वरूप, त्या व्यक्तीला अशा प्रकारे दोषी ठरविण्यात आले आहे ही वस्तुस्थिती आणि प्रकरणाच्या परिस्थितीवरून न्यायालयाला प्रसिद्ध करणे योग्य वाटतील असे इतर तपशील अशा व्यक्तीच्या खर्चाने आणि न्यायालयाला योग्य वाटेल अशा वर्तमानपत्रात किंवा न्यायालय निदेश देईल अशा रीतीने प्रसिद्ध करण्याची व्यवस्था सक्षम असेल.
२) पोटकलम (१) खालील कोणतीही प्रसिद्धी न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध अपील करण्यासाठी असलेला कालावधी कोणतेही अपील न करता समाप्त होण्यापूर्वी किंवा दाखल करण्यात आलेले अपील निकालात काढण्यात येण्यापूर्वी करण्यात येणार नाही.
३) पोटकलम (१) खाली कोणतीही प्रसिद्ध करण्याचा खर्च दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीकडून न्यायालयाने लादलेला दंड असल्याप्रमाणे वसूल करण्यात येईल.
