Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ३९ : विशिष्ट अपराध्यांना परिवीक्षेवर मुक्त करण्याचे न्यायालयाचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३९ :
विशिष्ट अपराध्यांना परिवीक्षेवर मुक्त करण्याचे न्यायालयाचे अधिकार :
१) कोणतीही व्यक्ती कलम २७ (किंवा गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अल्प मात्रासंबंधी शिक्षायोग्य असलेल्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे आढळून येईल आणि ज्या न्यायालयाला ती दोषी असल्याचे आढळून आले असेल त्या अपराधी व्यक्तीचे वय, चारित्र्य, पूर्वेतिहास किंवा शारीरिक किंवा मानसिक स्थिती यावरून असे मत होईल की, तसे करणे इष्ट आहे तर या अधिनियमात किंवा त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहही अंतर्भूत असले तरी, न्यायालय त्या व्यक्तीला ताबडतोब कोणतीही कैदेची शिक्षा फर्मावण्याऐवजी तिला शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या किंवा शासनाने मान्यता दिलेल्या एखाद्या रूग्णालयात किंवा संस्थेत,
आणि व्यसनमुक्तीसाठी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी तिच्या संमतीने आणि एक वर्षापेक्षा अधिक नाही अशा कालावधीत न्यायालयासमोर हजर होऊन आपल्या वैद्यकीय उपचारांच्या परिणामांसंबंधीचा अहवाला देण्यासाठीचा आणि दरम्यानच्या काळात प्रकरण चार खालील कोणताही अपराध करण्यापासून दूर राहण्याबाबतचा शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील जामिनासह किंवा जामिनाशिवायचा बॉन्ड करून दिल्यावर त्याला शिक्षा देण्याऐवजी अशा उपचारांसाठी मुक्त करण्याबाबत निर्देश देईल.
२) पोटकलम (१) अन्वये देण्यात आलेला वैद्यकीय उपचारांच्या परिणामासंबंधीचा अहवाला विचारात घेतल्यानंतर न्यायालयाला असे आढळून आले की, अपराधी न्यायालयाला विनिर्दिष्ट करणे योग्य वाटेल अशा तीन वर्षांपेक्षा अधिक नाही अशा कालावधीसाठी प्रकरण चार खालील अपराधापासून दूर राहील आणि अशा प्रकारे अपराधापासून दूर राहण्यात तो अपयशी ठरल्यास, अशा कालावधीत फर्मावण्यात येईल. तेव्हा न्यायालयासमोर राहण्याबाबतचा आणि शिक्षा भोगण्यासंबंधीचा जामिनासह किंवा जामिनाशिवायचा बॉन्ड करून दिल्यावर अशा अपराध्याला मुक्त करण्याबाबतचा आदेश देणे योग्य आहे; असे न्यायालयाला वाटल्यास, न्यायालय तेस निदेश देऊ शकेल.

Exit mobile version