Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ३८ : कंपन्यांनी केलेले अपराध:

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३८ :
कंपन्यांनी केलेले अपराध:
प्रकरण चार खालील अपराध एखाद्या कंपनीने केला असेल अशा बाबतीत अपराध करण्यात आला असेल, तेव्हा कंपनीची प्रभारी असणारी आणि कंपनीचे कामकाज चालविण्यास जबाबदार असणारी प्रत्येक व्यक्ती व त्याचप्रमाणे कंपनी त्या अपराधासाठी जबाबदार असल्याचे मानण्यात येईल आणि तद्नुसार त्यांच्याविरूद्ध कार्यवाही करण्यास आणि शिक्षा करण्यास त्यांना पात्र ठरविण्यात येईल.
परंतु, अपराध आपल्याला माहीत नसताना केला किंवा असा अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती काळजी आपण घेतली होती असे सिद्ध करील अशी कोणतीही व्यक्ती या पोटकलमात अंतर्भूत असणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे शिक्षा होण्यास पात्र ठरवली जाणार नाही.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, प्रकरण चारखालील कोणताही अपराध एखाद्या कंपनीने केला असेल आणि तो अपराध कंपनीचे कोणतेही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांच्या संमतीने झाला आहे किंवा त्यांच्या काणाडोळा करण्यामुळे झाला आहे किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाला आहे, असे सिद्ध करण्यात आले असल्यास असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांना अशा अपराधासाठी दोषी ठरविण्यात येईल आणि तद्नुसार न्यायचौकशी केली जाण्यास आणि शिक्षा केली जाण्यास ते पात्र ठरतील.
स्पष्टीकरण – या कलमाच्या प्रयोजनासाठी –
अ) कंपनी म्हणजे कोणताही निगम निगम होय आणि त्यात संख्या किंवा संघ यांचा समावेश होतो; आणि
ब) संचालक म्हणजे भागीदारी संस्थेच्या संबंधात अशा संस्थेच्या भागीदार होय.

Exit mobile version