Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ३४ : अपराध करण्यापासून दूर राहण्याबाबत जामीन :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३४ :
अपराध करण्यापासून दूर राहण्याबाबत जामीन :
१) एखाद्या व्यक्तीला प्रकरण चारच्या कोणत्याही तरतुदीन्वये शिक्षा योग्य असलेल्या एखाद्या अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल आणि या अधिनियमाखालील कोणताही अपराध करण्यापासून दूर राहण्यासाठी त्या व्यक्तीला बंधपत्र करण्यास फर्मावणे आवश्यक आहे, असे त्याला दोषी ठरविणाऱ्या न्यायालयाचे मत असल्यास, अशा न्यायालयाला अशा व्यक्तीला शिक्षा देताना कोणत्याही वेळी, प्रकरण चार खालील कोणताही अपराध करण्यापासून त्याला न्यायालयाला योग्य वाटतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त तीन वर्षेपर्यंत दूर ठेवण्यासाठी उद्देशाशी समतुल्य ठरेल इतक्या रकमेची प्रतिभूती जामीनदारासह किंवा जामीनदाराविना करण्याबाबत आदेश देऊ शकेल.
२) हे बंधपत्र केंद्र सरकारकडून विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असेल आणि फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चार) याच्या तरतुदी त्या जितपत लागू होण्याजोग्या असतील तितपत, अशा बंधपत्राच्या संदर्भातील सर्व बाबींना जणूकाही त्या संहितेच्या कलम १०६ अन्वये शांतता रक्षणासाठी करण्याचे आदेश दिलेले ते बंधपत्र असल्याप्रमाणे लागू होतील.
३) अपिलांती किंवा अन्य कारणाने असा दोषारोप रद्द करण्यात आल्यास अशा प्रकारे करण्यात आलेले बंधपत्र निरर्थक ठरेल.
४) या कलमाखालील आदेश, एखाद्या अपील न्यायालयाला, उच्च न्यायालयाला किंवा सत्र न्यायालयालासुद्धा पुनर्विलोकनाच्या अधिकारांचा वापर करताना काढता येतील.

Exit mobile version