Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ३२ब : कमी शिक्षेहून जास्त शिक्षा देताना घटक विचारात घेणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३२ब :
कमी शिक्षेहून जास्त शिक्षा देताना घटक विचारात घेणे :
या अधिनियमाच्या तरतुदींपैकीच्या अपराधांसाठी जेव्हा कमीत कमी शिक्षा ठरवून दिली असेल अशा वेळी न्यायालय योग्य वाटल्यास पुढील घटकांचा विचार करून जास्तीत जास्त शिक्षा देऊ शकेल. ते घटक असे-
अ) अपराध्याने धमकी किंवा दहशत किंवा बळाचा वापर केला असेल,
ब) अपराधी हा शासकीय कार्यालयात नौकरीस असून त्याने अपराधासाठी त्या कार्यालयाची मदत घेतली असेल,
क) अज्ञान मुलानवर परिणाम होईल अशी किंवा अज्ञान मुलांचा अपराधासाठी वापर केला असल्यास,
ड) शैक्षणीक संस्थेत किंवा सेवा भावी संस्थेत किंवा अशा संस्थेच्या अगदी निकट किंवा शालेय मुलाचे आणि विद्याथ्र्यांचे शैक्षणीक, खेळाचे, सेवाभावी संकूलाच्या अन्य कोणत्याही ठिकाणी अपराधा घडला असल्यास,
ई) अपराधी अंतराष्ट्रीय संघटनेतील किंवा इतर कोणत्याही गुन्हेगारी टोळीशी संबंधीत असल्यास, आणि अपराधी हा अपराधाच्या वेळी इतरही बेकायदेशीर घडामोडीशी संलग्न असल्यास.

Exit mobile version