Site icon Ajinkya Innovations

Ndps act कलम ३१ : पूर्वीच्या अपराधानंतरच्या विशिष्ट अपराधासाठी वाढीव शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३१ :
पूर्वीच्या अपराधानंतरच्या विशिष्ट अपराधासाठी वाढीव शिक्षा :
१) कोणत्याही व्यक्तीस या अधिनियमान्वये तरतूदीन्वये, अपराध करण्याबद्दल किंवा तसे केल्याचा प्रयत्न केल्याबद्दल किंवा त्यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल किंवा त्यासाठी दंडनिय कट करण्याबद्दल दोषी ठरविण्यात आली असेल तर त्या व्यक्तीने पुन्हा अपराध करण्याबद्दल किंवा तसे करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल किंवा त्यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल किंवा त्यासाठी दंडनिय कट करण्याबद्दल दोषी ठरविण्यात आली असेल तर पुन्हा केलेल्या अपराधासाठी, त्या त्या अपराधाकरिता असलेल्या शिक्षेपैकी निम्मे कालावधीची सक्त मजूरीची शिक्षा आणि जास्तीतजास्त दंडाच्या निम्मे रक्कमेच्या दंडाचे शिक्षेस पात्र असेल.
२) उप-कलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला किमान मुदतीच्या कारावासाची आणि किमान रकमेच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, तर अशा व्यक्तीसाठी किमान शिक्षा 1. (किमान मुदतीच्या दीड पट) कारावासाची आणि 1. (किमान रकमेच्या दीड पट) दंडाची असेल:
तथापी न्यायालय न्यायनिणर्यात करणे नमूद करून त्यापेक्षा अधिक दंड सुद्धा लादू शकेल.
३) एखाद्या व्यक्तीला भारताबाहेर फौजदारी अधिकार क्षेत्र असलेल्या कोणत्याही सक्षम न्यायालयाने सुसंगत अशा कोणत्याही कायद्यान्वये दोषी ठरविण्यात आले असून अशा बाबतीत, दोष सिद्धी बाबत केट कलम १ व २ च्या प्रयोजनार्थ जनू काही अशा व्यक्तीला भारतातील एखाद्या न्यायालयातच दोषी ठरविण्यात आल्याप्रमाणे तिच्यावर कार्यवाही करू शकेल.
———-
१. २०१४ च्या कायदा क्रमांक १६ च्या कलम १४ द्वारे बदलले.

Exit mobile version