गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम १३ :
स्वादकारक (फ्लेवरिंग एजंट) तयार करताना वापरावयाच्या कोका वनस्पतीच्या आणि कोका पानांच्या बाबत खास तरतुदी:
कलम ८ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, ज्यामध्ये कोणतेही अल्कालॉईड असणार नाही असे स्वादकारक तयार करताना वापर करण्यासाठी कोणत्याही कोका वनस्पतीची लागवड करण्यास किंवा तिचा कोणताही भाग गोळा करण्यास किंवा कोका पानांचे उत्पादन करण्यास, ती कब्जात ठेवण्यास, त्यांची विक्री, खरेदी, वाहतूक, आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात किंवा भारतात आयात करण्यास केंद्र सरकार सर्शर्त किंवा बिनर्शत आणि शासनाच्या वतीने व अशा वापरासाठी आवश्यक असेल त्या मर्यादेपर्यंत परवानगी देऊ शकेल.
