Site icon Ajinkya Innovations

Mv act 1988 कलम १२८ : चालक आणि पिलियनवर बसणाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १२८ :
चालक आणि पिलियनवर बसणाऱ्यांसाठी सुरक्षा उपाय :
१) दुचाकी मोटार सायकलच्या चालकाने स्वत:खेरीज एकापेक्षा अधिक व्यक्तींना मोटार सायकलवरून नेता कामा नये आणि अशा व्यक्तीला मोटार सायकलला चालकाच्या बैठकीच्या जागेच्या मागे सुरक्षितपणे जोडलेल्या योग्य बैठकीवर योग्य ते सुरक्षा उपाय योजून बसलेली असल्याशिवाय अन्य प्रकारे नेता कामा नये.
२) पोट-कलम (१) मध्ये नमूद करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजाशिवाय दुचाकीच्या चालकासाठी आणि त्यावरील पिलियन वरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी अन्य सुरक्षा उपाययोजना केंद्र शासनाला विहित करता येतील.

Exit mobile version