मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम (62B)(६२ख) ६२ब :
१.(मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर (नोंदवही) :
१) केन्द्र शासन विहित केलेल्या नमुन्यात व पद्धतीत मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर (नोंदवही) ठेवेल :
परंतु मोटार वाहनांचे राज्य रजिस्टर, राष्ट्रीय रजिस्टर मध्ये, केन्द्र शासन राजपत्रामध्ये अधिसूचित करेल त्या दिनांका पर्यंत सम्मिलित केले जाईल.
२) या अधिनियमाखाली, मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर अन्वये एक विशिष्ट रजिस्ट्रीकरण संख्या (नोंदणी क्रमांक) दिल्याशिवाय, नोंदणी किंवा नूतनीकरणाचे प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
३) मोटार वाहनांचे राष्ट्रीय रजिस्टर व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्व राज्य शासने आणि नोंदणी प्राधिकरणे या अधिनियमाखाली विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व पद्धतित सर्व माहीती आणि डाटा केन्द्र शासनाला पाठविल.
४) राज्य सरकार मोटार वाहनांच्या राष्ट्रीय नरजिस्टर मधील माहीती जाणून घेण्यास हक्कदार असेल आणि या अधिनियमाच्या उपबंधानुसार व केन्द्र शासन विहित केलेल्या नियमांनुसार कागदपत्रे अद्ययावत करु शकेल.)
———
१. २०१९ चा अधिनियम ३२ याच्या कलम २५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.