मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ६ :
राज्य-परिवहन उपक्रमाच्या संबंधातील विशेष तरतुदी :
कलम ९७ :
व्याख्या :
या प्रकरणात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसल्यास मार्ग परिवहन सेवा याचा अर्थ, भाडे किंवा मोबदला याच्या बदल्यात प्रवशांची किंवा मालाची किंवा दोन्हींची रस्त्यावरून वाहतूक करणारी मोटार वाहन सेवा असा आहे.