Mv act 1988 कलम ९६ : या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९६ :
या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
१) या प्रकरणाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील.
२) पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणेस बाध न आणता या कमलाखाली पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी नियम करता येतील त्या बाबी अशश-
एक) प्रादेशिक व राज्य परिवहन प्राधिकरणाच्या नेमणुकीचा कालावधी आणि त्यांच्या नेमणुकीच्या अटी आणि त्यांना पार पाडावयाचे कामकाज आणि त्यांनी द्यावयाचे अहवाल;
दोन) अशा कोणत्याही प्राधिकरणाने त्याच्या कोणत्याही सदस्याच्या (समापतीसह) गैरहजेरीत कामकाज चालविणे आणि अशा प्रकारे कोणत्या स्वरूपाचे कामकाज कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या रीतीने पार पाडावयाचे;
तीन) या कलमाखाली दाखल करता येतील अशी अपिले दाखल करणे आणि त्यांची सुनावणी पार पाडणे, अशा अपिलांच्या संबंधात द्यावयाची फी आणि अशा फीचा परतावा;
चार) या प्रकरणाच्या प्रयोजनांसाठी वापरावयाचे नमुने, परवाना नमुन्यांसह;
पाच) गहाळ झालेल्या, नष्ट झालेल्या किंवा जीर्णशीर्ण झालेल्या परवान्यांच्या दुसऱ्या प्रती देणष;
सहा) परिवहन वाहनासोबत न्यावयाची कागदपत्रे, पाट्या व चिन्हे, ती ज्या रीतीने वाहून न्यावयाची ती रीत असे कोणतेही दस्तऐवज ज्या भाषेत लिहावयाचे ती भाषा;
सात) परवान्यासाठी करावयाच्या अर्जासोबत, परवान्याच्या दुसऱ्या प्रतीच्या अर्जासोबत आणि पाटीसाठीच्या अर्जासोबत भरावयाची फी;
आठ) या प्रकरणाखाली द्यावयाची फी पूर्णपणे किंवा तिचा भाग भरण्यापासून सूट द्यावयाच्या विहित व्यक्ती किंवा व्यक्तींचा विहित वर्ग;
नऊ) परवाने रद्द करण्यात आल्यावर किंवा त्यांची मुदत संपल्यावर ते ताब्यात ठेवणे, हजर करणष किंवा रद्द करणे आणि रद्द करण्यात आलेले परवाने परत करणे.
दहा) एका राज्यात देण्यात आलेला परवाना अन्य राज्यासाठी कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या मर्यादेपर्यंत प्रतिस्वाक्षरीविना कायदेशीर ठरेल, त्या शर्ती व मर्यादा;
अकरा) राज्याच्या एका प्रदेशात देण्यात आलेले परवाना राज्यातील दुसऱ्या प्रदेशात प्रतिस्वाक्षरीविना ज्या शर्तींना अधीन राहून आणि ज्या मर्यादेपर्यंत कायदेशीर असेल त्या शर्ती व मर्यादा;
बारा) कलम ६७, पोट-कलम (१), खंड (तीन) मध्ये निर्देश केल्याप्रमाणष असलेल्या कोणत्याही कराराची अंमलबजावणी करण्यासाठी परवान्यास जोडावयाच्या शर्ती;
तेरा) अपिले, कोणत्या प्राधिकरणांकडे, कोणत्या कालावधीत आणि कोणत्या रीतीने करता येतील;
चौदा) टप्पा गाड्या व करारावरील वाहने यांची सर्वसाधारणपणे किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रामध्ये असणे आवश्यक असलेली बांधणी व जोडसामग्री व त्यांनी बरोबर ठेवावयाची साधसामग्री;
पंधरा) टप्पा गाड्या किंवा करारावरील गाड्या किती प्रवासी वाहून नेण्याजेग्या करावयाच्या व त्यातून किती प्रवासी वाहून नेता येतील ती संख्या ठरविणे;
सोळा) टप्पा गाडीतून किंवा करारावरील गाडीतून प्रवाशाच्याएवजी मालाची वाहतूक कोणत्या शर्तीच्या अधीन करता येईल ती शर्त;
सतरा) टप्पा गाडी किंवा करारावरील गाड्या यामध्ये राहून गेलेल्या मालमत्तेचा सुरक्षित ताबा व विल्हेवाट;
अठरा) परिवहन वाहनांना रंग देणे किंवा ती चिन्हांकित करणे व त्यावर जाहिरातीचा मजकूर प्रर्दित करणे या गोष्टी विनियमित करणे आणि विशेषत: एखादे परिवहन वाहन टपाल वाहून नेण्यासाठी वापरण्यात येते असा कोणत्याही व्यक्तीचा समज होईल अशा रंगाने किंवा अशा रीतीने ते वाहन रंगविण्यास किंवा चिन्हांकित करण्यास मनाई करणे;
एकोणीस) टप्पा वाहनातून किंवा करारावरील वाहनातून प्रेतांची किंवा साथीच्या किंवा संसर्गजन्य रोगाची बाधा झालेल्या व्यक्तीची किंवा प्रवाशांना गैरसोय होण्याची किंवा इजा पोहोचण्याची शक्यता असे, अशा मालाची ने-आण करणे आणि जर अशा कामासाठी वाहनाचा वापर करण्यात आला तर त्यांची तपासणी करणे व ती निर्जंतुक करून घेणे;
वीस) मान्यता आणि प्रमाण दर्जाचे मीटर बसविण्याची आवश्यकता असलेल्या मोटार कॅबवर टॅक्सी मीटर बसविण्याची तरतूद करणे आणि टॅक्सी मीटरची तपासणी करणे, चाचणी घेणे आणि ते सीलबंद करणे;
एकवीस) विनिर्दिष्ट ठिकाणी किंवा विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा योग्य रीतीने अधिसूचित करण्यात आलेले थांबे किंवा विरामस्थाने याखेरीज अन्य ठिकाणी टप्पा गाड्यात किंवा करारावरील गाड्यात प्रवशांना चढण्यास किंवा उतरण्यास मनाई करणे आणि अधिसूचित विरामस्थानावर वाहनात चढण्याची किंवा त्यातून उतरण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशाने तसे सांगितले असता त्या ठिकाणक्ष वाहन थांबविण्यास आणि वाजवी काळपर्यंत वाहन थांबवून ठेवण्यास टप्पा वाहनाच्या चालकास फर्माविणे;
बावीस) कोणत्याही रीतसर करण्यात आलेल्या थांब्याचे किंवा विरामस्थानाचे बांधकाम किंवा वापर करण्यसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पूर्ण करणे आणि अशा ठिकाणांचा वापर करणाऱ्या सर्वांच्या सायीसाठी पुरेशी साधसामग्री व सुविधा पुरविणे; अशा सुविधांचा वापर करण्यासाठी भरावयाची फी, कोणतीही असल्यास, असे थांबे व विरामस्थाने येथे ठेवावयाचे अभिलेख, त्या ठिकाणी नेमावयाचा कर्मचारीवर्ग आणि अशा कर्मचारीवर्गाची कर्तव्ये व वर्तणूक आणि सर्वसाधारणपणे असे थांबे व विरामस्थाने सेवायोग्य आणि स्वच्छ स्थितीत ठेवणे;
तेवीस) मोटार कॅबच्या दर्जाचे विनियमन करणे;
चोवीस) परिवहन वाहनाच्या मालकास पत्त्यातील कोणताही बदल अधिसूचित करण्यास किंवा भाड्याने किंवा बक्षिसाच्या बदल्यात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारे कोणतेही वाहन बंद पडल्यास किंवा त्याला नुकसान पोहोचल्यास ते कळविण्याबाबत फर्माविणे;
पंचवीस) परवानाधारक आपल्या कामकाजासाठी वापरीत असलेल्या सर्व वास्तूमध्ये कोणत्याही वाजवी वेळी प्रवेश करून त्या वास्तूची तपास करण्यास विनिर्दिष्ट व्यक्तींना प्राधिकृत करणे;
सव्वीस) टप्पा वाहनाया प्रभारी व्यक्तीला, कायदेशीर किंवा नेहमतीचे भाडे देऊ करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाची ने आण करण्यास फर्माविणे;
सत्तावीस) कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या प्रकारच्या डब्यातून किंवा वाहनातून प्राणी किंवा पक्षी यांची ने-आण करता येईल आणि कोणत्या हंगामात प्राणी किंवा पक्षी वाहून नेता येतील किंवा येणार नाहीत.
अठ्ठावीस) सार्वजनिक सेवा वाहनातून प्रवास करण्यासाठी तिकिटाची विक्री करण्याचे काम करणारे किंवा अन्य प्रकारे अशा वाहनातून प्रवास करण्यासाठी प्रचार करणारे एजंट किंवा प्रचारक यांना लायसन देणे आणि त्यांची वर्तणूक विनियमित करणे;
एकोणतीस) मालवाहून वाहनातून वाहून नेण्यात येणारा माल पुढे पाठविण्यसाठी किंवा वितरणासाठी स्वीकारण्याचा व्यवसाय करणाऱ्या अभिकत्र्यांना लायसन देणे;
तीस) परिवहन वाहने, त्यातील वस्तू आणि त्यांच्याशी संबंधित असलेले परवाने यांची तपासणी करणे;
एकतीस) मालवाहू वाहनातून चालकाखेरीज इतर व्यक्तींना वाहून नेणे;
बत्तीस) परिवहन वाहनाच्या मालकाने ठेवावयाचे अभिलेक आणि सादर करावयाची विवरणपत्रे; आणि
१.(बत्तीस अ (क)) कलम ६७ च्या पोटकलम (३) अंतर्गत बनविलेली योजना;
बत्तीस ब (ख)) प्रभावी प्रतिस्पर्धा, प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षितता, स्पर्धात्मक भाड्याचे संवर्धन आणि गर्दी रोखण्यासाठी प्रोत्साहन;)
तेहतीस) विहित करावयाच्या किंवा विहित करता येतील अश इतर कोणत्याही बाबी;
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३८ अन्वये मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply