मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९५ :
टप्पा वाहने आणि करारावरील वाहने या संबंधात नियम करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :
१) टप्पा वाहने आणि करारावरील वाहने यांच्या संबंधात आणि अशा वाहनातील प्रवाशंची वर्तणूक विनियमित करण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील.
२) पूर्वगामी तरतुदींच्या सर्वसाधारणेस बाधा न आणता अशा नियमाद्वारे-
(a)क)अ) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, वाहनाच्या चालकाने किंवा वाहकाने किंवा चालकाच्या किंवा वाहकाच्या qवनतीवरून किंवा कोणत्याही प्रवाशाच्या विनंतीवरून कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने अशा वाहनामधून बाहेर काढणष प्राधिकृत करता येईल;
(b)ख)ब) जो नियमांचा भंग करतो असा वाजवी संशय चालक किंवा वाहकाला असेल अशा प्रवाशाला पोलीस अधिकाऱ्याने किंवा चालक किंवा वाहकाने मागणी केल्यावर त्याचे नाव व पत्ता देण्यास फर्मावता येईल;
(c)ग) क) चालकाने किंवा वाहकाने तसे फर्मावल्यास, आपला कोठपर्यंत प्रवास करण्याचा उद्देश आहे किंवा कोठपर्यंतचा प्रवास पार पाडला आहे हे घोषित करण्यास आणि अशा संपूर्ण प्रवासासाठी भाडे देण्यास आणि त्यासाठी देण्यात आलेले तिकिट स्वीकारण्यास एखाद्या प्रवाशाला भाग पाडता येईल.
(d)घ)ड) चालकाने किंवा वाहकाने किंवा वाहनाच्या मालकाने त्या प्रयोजनासाठी मागणी केली असता तिकिट धारक व्यक्तीला तिला देण्यात आलेले तिकिट प्रवासाच्या दरम्यान सादर करण्यास किंवा प्रवासाच्या अखेरीस परत करण्यास भाग पाडता येईल;
(e)ड)ई) प्रवाशाने ज्यासाठी भाडे दिले असेल, असा प्रवास पूर्ण झाल्यांनतर चालकाने किंवा वाहकाने तशी विनंती केली असता त्याला वाहनातून उतरून जाण्यास फर्मावता येईल.
(f)च)फ) तिकिट धारकाने ज्या कालावधीसाठी तिकिट धारण केले असेल, तो कालावधी समाप्त होताच त्याला देण्यात आलेले तिकिट परत करण्यास फर्मावता येईल.
(g)छ)ग) वाहन चालकास अडथळा पोहोचल्याचा किंवा त्यात हस्तक्षेप होण्याचा किंवा वाहनाचा कोणत्याही भागास किंवा त्याच्या साधन सामग्रीस नुकसान पोहोचण्याच्या किंवा सतर कोणत्याही प्रवाशाला इजा पोहोचण्याचा किंवा त्याची गैरसोय होण्याचा संभव असेल अशी कोणतीही कृती करण्यापासून करावृत्त होण्यास एखाद्या प्रवाशास फर्मावता येईल;
(h)ज)ह) धुम्रपानास मनाई करणारी नोटीस ज्यामध्ये प्रदर्शित करण्यात आली असेल, अशा कोणत्याही वाहनात धुम्रपान न करण्यास प्रवाशास फर्मावता येईल.
(i)झ)आय) टप्पा वाहनात तक्रार नोंदवह्या ठेवण्यास फर्मावता येईल आणि कोणत्या परिस्थितीती प्रवाशांना त्यात कोणत्याही तक्रारी नोंदविता येतील ते विहित करता येईल.