Mv act 1988 कलम ९१ : चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९१ :
चालकाच्या कामाच्या तारणांवर निर्बंध :
१.(१) परिवहन वाहन चालविण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीचे कामाचे तास मोटार परिवहन कामगार अधिनियम, १९६१ मध्ये तरतूद करण्यात आल्याप्रमाणे असतील.)
२) आणीबाणीच्या आणि अकल्पित अशा परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या कारणामुळे होणारा विलंब याबाबतच्या प्रकरणांचे निवारण करण्यासाठी पोट-कमल (१) च्या तरतुदींमधून राज्य शासनाला योग्य वाटतील अशा माफी राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून देऊ शकेल.
३) राज्य शासन किंवा कलम ९६ खाली करण्यात आलेल्या नियमांद्वारे राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केले असेल, तर राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ज्यांचे काम पोट-कलम (१) च्या कोणत्याही तरतुदींना अधीन असते अशा कोणत्याही व्यक्तींना कामावर नेमणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, अशा तरतुदींशी मिळत्याजुळत्या होतील अशा प्रकारे अशा व्यक्तींचे कामाचे तास आगाऊपणे निश्चित करण्यास फर्मावू शकेल आणि अशा प्रकारे निश्चित करण्यात आलेल्या वेळा नमूद करण्याची तरतूद करू शकेल.
४) पोट-कलम (३) नुसार निश्चित करण्यात आलेल्या किंवा अभिलिखित करण्यात आलेल्या कामाच्या तासांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने काम करता कामा नये किंवा कोणत्याही व्यक्तीला काम करण्यास लावता काम नये किंवा तशी परवानगी देता कामा नये.
५) वाहनाचा चालक कामात गुंतलेला नसला, तरी ज्या परिस्थितीत व ज्या वेळात त्याला वाहनाच्या जवळपास थांबावे लागते ती परिस्थिती व तो कालावधी राज्य शासनाला विहित करता येईल आणि पोट-कलम (१) च्या अर्थानुसार तो विश्रांतीचा मध्यांतर असल्याने मानण्यात येईल.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २९ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply