मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९० :
पुनरिक्षण :
ज्या प्रकरणामध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने आदेश दिला असेल व त्याविरूद्ध अपील होऊ शकत नसेल अशा कोणत्याही प्रकरणाचा अभिलेख, राज्य परिवहन अपील प्राधिकरण त्याच्याकडे तसा अर्ज करण्यात आल्यावरून मागवू शकेल आणि राज्य परिवहन अपील प्राधिकरणाने किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दिलेला आदेश अयोग्य किंवा अवैध असल्याचे राज्य परिवहन अपील प्राधिकरणास दिसून आल्यास, राज्य परिवहन अपील प्राधिकरणास त्या प्रकरणाच्या संबंधात त्याला योग्य वाटेल असा आदेश देऊ शकेल व असा प्रत्येक आदेश अंतिम असेल.
परंतु, एखाद्या राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेल्या एखाद्या व्यक्तीने अशा आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत असा अर्ज केलेला असल्याखेरीज राज्य परिवहन अपील न्यायधिकरण असा कोणताही अर्ज स्वीकारणार नाही.
परंतु, आणखी असे ही की, राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण कोणत्याही व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय तिला बाधक ठरेल, असा कोणताही आदेश या कलमान्वये काढणार नाही.