मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८८ :
परवाने ज्या प्रदेशात देण्यात आले असतील त्या प्रदेशाबाहेर त्यांचा वापर करण्यासाठी ते कायदेशीर ठरविणे :
१) अन्य प्रकारे विहित करण्यात येईल ते खेरीज करून, कोणत्याही एका प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने त्यावर प्रतिस्वाक्षरी केलेली असल्याशिवाय कायदेशीर असणार नाही आणि कोणत्याही एका राज्यात दिलेला परवाना अन्य कोणत्याही राज्यात त्या अन्य राज्याच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने प्रतिस्वाक्षरी केलेली असल्याशिवाय कायदेशीर असणार नाही;
परंतु, कोणत्याही एका प्रदेशाच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दिलेला मालवाहन परवाना त्याच राज्यातील अन्य कोणत्याही प्रदेशातील किंवा प्रदेशांमधील कोणत्याही क्षेत्रासाठी त्या अन्य प्रदेशाया किंवा संबंधित प्रदेशांपैकी इतर प्रत्येक प्रदेशाच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची स्वाक्षरी नसली तर कायदेशीर असणार नाही:
परंतु आणखी असे की, सुरू होण्याचा आणि समाप्त होण्याचा हे दोन्ही मार्ग एकाच राज्यात असतील, परंतु अशा मार्गाचा काही भाग दुसऱ्या कोणत्याही राज्यात असेल आणि अशा भागाची लांबी सोळा किलोमीटरपेक्षा अधिक नसेल, तर अशा परवान्यावर त्या अन्य राज्याच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा त्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने प्रतिस्वाक्षरी केली नसली, तरी त्या नियम मार्गाचा जो भाग त्या राज्यात येत असेल, त्या भागाच्या बाबतीत त्या अन्य राज्यात तो कायदेशीर असेल;
परंतु आणखी असेही की –
(a)क)अ) एका राज्यात देण्यात आलेल्या परवान्याच्या कक्षेत येणाऱ्या एखाद्या मोटार वाहनाच्या संरक्षणाच्या प्रयोजनासाठी दुसऱ्या एखाद्या राज्यात वापर करावयाचा असेल, अशा बाबतीत केवळ संरक्षणाच्या प्रयोजनासाठी, विनिर्दिष्ट करण्यात आला असेल, अशा कालावधीसाठी ते वाहन वापरण्यात येईल अशा आशयाचे, केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा नमुन्यातील आणि अशा प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र अशा वाहनावर लावण्यात आले पाहिजे; आणि
(b)ख)ब) असा परवाना त्या अन्य राज्याच्या परिवहन प्राधिकरणाकडून किंवा प्रादेशिक परिहन प्राधिकरणाकडून किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून प्रतिस्वाक्षरित करण्यात आलेला नसला तरीही, त्या अन्य राज्यात कायदेशीर राहील.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अतंर्भूत असले, तरीही राज्य परिवहन प्राधिकरणाकडून प्रतिस्वाक्षरीत करण्यात आलेला परवाना संपूर्ण राज्यात किंवा राज्यातील परवान्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आले असतील अशा प्रदेशांमध्ये कायदेशीर असेल.
३) राज्य परिवहन प्राधिकरण परवान्यावर प्रतिस्वाक्षरी करताना त्यावर अशी कोणतीही शर्त लादू शकेल जी त्याने स्वत: परवाना दिला असता, तर लादली असती आणि तसेच, ज्या प्राधिकरणाने परवाना दिला असेल, अशा प्राधिकरणाने परवान्यावर ज्या शर्ती लादल्या असतील त्यापैकी कोणत्याही शर्तीमध्ये फेरफार करू शकेल.
४) परवाना देणे, तो रद्द करणे किंवा निलंबित करणे या गोष्टीशी संबंधित असलेल्या या प्रकरणाच्या तरतुदी परवान्यावर प्रतिस्वाक्षऱ्या करणे, त्या रद्द करणे किंवा निलंबित करणे या बाबतीतही लागू असतील :
परंतु, एका राज्यात देण्यात आलेला परवाना, पोट-कलम (५) च्या आवश्यकतांचे पालन करून राज्यामध्ये करण्यात आलेल्या कोणत्याही करारनाम्याच्या परिणामी त्या दुसऱ्या राज्याच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने प्रतिस्वाक्षरी करणे आवश्यक असेल, अशा बाबतीत परवान्यावर प्रतिस्वाक्षरी करण्यासाठी कलम ८० मध्ये घालून दिलेल्या कार्यवाहीचे पालन करणे आवश्यक असणार नाही.
५) अशा प्रत्येक मार्गाच्या किंवा क्षेत्राच्या बाबतीत किती परवाने द्यावयाचे किंवा प्रतिस्वाक्षरित करावयाचे त्यांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्याराज्यांमद्ये करावयाचे बाबतीतला प्रत्येक प्रस्ताव प्रत्येक संबंधित राज्य शासनाकडून शासकीय राजपत्रात आणि करारमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रात किंवा मार्गावर प्रसृत होणाऱ्या प्रादेशिक भाषेतील कोणत्याही एका किंवा अधिक वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात येईल आणि त्या साबेत त्यासंबंधातील अभिवेदन कोणत्या दिनांकास सादर करण्यात यावीत आणि प्रस्ताव व त्यासंबंधातील अभिवेदन कोणत्या दिनांकास सादर करण्यात यावीत आणि प्रस्ताव व त्यासंबंधात आलेली कोणतीही अभिवेदने अशा प्रकाशनाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आतील नसेल, अशा कोणत्या दिनांकास आणि कोणत्या प्राधिकरणाकडून आणि कोणत्या वेळी व ठिकाणी विचारात घेतली जातील त्याबद्दलची नोटीस देण्यात येईल.
६) राज्याराज्यामध्ये झालेला प्रत्येक करार तो जितपत परवाना प्रतिस्वाक्षरीत करण्याशी संबंधित असेल, तितपत संबंधित राज्य शासनाकडून शासकीय राजपत्रात आणि करारामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रामध्ये किंवा मार्गावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रादेशिक भाषेतील कोणत्याही एका किंवा अधिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्या राज्याचे राज्य प्रादेशिक प्राधिकरण आणि संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तो अमलात आणील.
७) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, एका प्रदेशाचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कलम ८७ खाली, अन्य प्रदेशाच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या किंवा प्रकरणपरत्वे अन्य राज्याच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या किंवा प्रकरणपरत्वे अन्य राज्याच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सर्वसाधारणपणे किंवा विशिष्ट प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या संमतीने त्या अन्य प्रदेशात किंवा राज्यात कायदेशीर मानण्यात येणारा तात्पुरता परवाना देऊ शकेल.
८) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले, तरी केंद्र शासनाकडून या अधिनियमान्वये करण्यात येतील, अशा नियमांना अधीनराहून कोणत्याही एका प्रदेशाच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला किंवा यथास्थिती, राज्य परिवहन प्राधिकरणाला जनतेच्या सोयीसाठी, स्पष्ट किंवा गर्भित कराराद्वारे भाडे किंवा बक्षीसाच्या बदल्यात एका किंवा अनेक उतारूंना वाहून नेण्यासाठी व करारात समाविष्ट नसेल अशा वाटेतील नियम मार्गावरील उतारूंणा घेण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी न थांबता वाहनाचा संपूर्णपणे वापर करण्यासाठी कलम ७२ नुसार किंवा ७४ नुसार किंवा त्या कलमाच्या पोट-कलम (९) नुसार देण्यात आलेल्या परवानगीमध्ये १.(समाविष्ट असलेला (टप्पा वाहनासह), कोणत्याही वाहनासह कोणत्याही सार्वजनिक सेवा वाहनाला) विशेष परवाना देऊ शकेल आणि असा विशेष परवाना देण्यात आला असेल, अशा प्रत्येक वाहनाच्या बाबतीत, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अशा वाहनासाठी त्यावर प्रदर्शित करण्यासाठी, केंद्र शासनाने विनिर्दिष्ट केला असेल, अशा नमुन्यातील व अशा पद्धतीने एक विशेष भिन्नता दर्शक चिन्ह नेमून देईल आणि असा विशेष परवाना अन्य कोणत्याही प्रदेशात किंवा राज्यात त्या अन्य प्रदेशाच्या प्रादेशिक प्राधिकरणाची किंवा यथास्थिती त्या अन्य राज्याच्या राज्यपरिवहन प्राधिकरणाची प्रतिस्वाक्षरी नसली तरी कायदेशीर असेल.
९) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले, तरी केंद्र शासन, पोट-कलम (१४) अन्वये करील अशा नियमांना अधीन राहून, कोणत्याही राज्य परिवहन प्राधिकरणाला पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयोजनासाठी, संपूर्ण भारतासाठी किंवा अर्जात दर्शविण्यात आलेल्या पंसती प्रमानुसार, परवान्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा, ज्या राज्यात परवाना दिला असेल त्या राज्यासह त्याच्या आजूबाजूच्या किमान ती राज्यांसाठी कायदेशीर असतील असे, पर्यटन वाहनासंबंधीचे परवाने देऊ शकेल. आणि अशा परवान्याला कलमे ७३,७४,८०,८१,८२,८३,८४,८५,८६ १.(कलम ८७, पोटकलम (१) चा खंड (ड) आणि कलम ८९) च्या तरतुदी शक्य तेथवर लागू होतील.
१०) २.(***)
११) पोट-कलम (९) अन्वये देण्यात आलेल्या प्रत्येक परवान्यासाठी पुढील शर्ती असतील-
एक) ज्याच्या संबंधात असा परवाना देण्यात आला असेल असे प्रत्येक मोटार वाहन, त्याचे वर्णन, बैठकीच्या क्षमतेसंबंधीच्या आवश्यकता, आराम, सोयी आणि इतर बाबी यांचा दर्जा या बाबतीत केंद्र शासन या बाबतीत विनिर्दिष्ट करील अशा प्रकारचे असेल पाहिजे;
दोन) असे प्रत्येक मोटार वाहन, केंद्र शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील, अशा पात्रता धारण करणाऱ्या आणि अश शर्ती पुऱ्या करणाऱ्या व्यक्तीकडून विहित करण्यात आले पाहिजे; आणि
तीन) केंद्र शासनाकडून विहित करण्यात येतील अशा इतर शर्ती.
१२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, केंद्र शासन पोटकलम (१४) अन्वये करील अशा नियमांना अधीन राहून, दूर अंतराच्या आंतरराज्य मार्ग परिवहनास प्रोत्साहन देण्यासाठी समुचित प्राधिकरण, मालवाहतुकीच्या संबंधात राजयत राष्ट्रीय परवाने देऊ शकेल आणि कलमे ६९,७७,७९,८०,८१,८२,८३,८४,८५,८६ १.(कलम ८७, पोट-कलम (१) चा खंड (५) व कलम ८९) च्या तरतुदी शक्य असेल तितपत, राष्ट्रीय परवाने देण्याच्या किंवा त्यासंबंधात लागू होतील
१३) २.(***)
१४) (a)क) अ) सदर कलमाच्या तरतुदी पार पाडण्यासाठी केंद्र शासन नियम करू शकेल.
(b)ख) ब) विशेषत: आणि पूर्वगामी अदिकाराच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता अशा नियमामध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तरतुद करता येईल-
एक) पोट-कलम (९) आणि (१२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेला परवाना देण्यासाठी देय असलेली फी प्राधिकृत करणे;
दोन) मोटार वाहनाचे भारीत वजन निश्चित करणे;
तीन) मोटार वाहनामध्ये किंवा मोटार वाहनावर वाहून न्यायच्या किंवा प्रदर्शित करावयाचा विभेदक तपशील किंवा चिन्हे;
चार) मोटार वाहनाला द्यावयाचा किंवा द्यावयाचे रंग;
पाच) राष्ट्रीय परवाना देण्याच्या बाबतीत, समुचित प्राधिकरणाला योग्य वाटतील अशा इतर बाबी;
स्पष्टीकरण :
या कलमात –
(a)क)अ) समुचित प्राधिकरण याचा राष्ट्रीय परवान्याच्या संबंधातील अर्थ मालवाहू वाहनासाठी परवाना देण्यासाठी या अधिनियमान्वये प्राधिकृत करण्यात आले असेल असे प्राधिकरण असा आहे;
(b)ख) ब)प्राधिकृती फी याचा अर्थ, पोट-कलमे (९) व (१२) मध्ये निर्देशिलेल्या परवान्याच्या कक्षेत येताचा मोटार वाहनाचा अन्य राज्यामध्ये उपयोग करणे शक्य व्हावे म्हणून संबंधित राज्याकडून आकारण्यात येणारे कोणतेही कर किंवा फी असल्यास, ती भरण्यात आल्यानंतर समुचित प्राधिकरणाकडून आकारण्यात येणारी एक हजार रूपयांपेक्षा अधिक नसेल अशी वार्षिक फी असा आहे;
(c)ग) क) राष्ट्रीय परवाना याचा अर्थ, भारताच्या संपूर्ण संघराज्य क्षेत्रात किंवा अर्जात दर्शविण्यात आलेल्या पंसतीक्रमानुसार परवान्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील, अशा ज्या राज्यात असा परवाना देण्यात आला असेल, त्या राज्यासह त्याच्या लगतच्या चार राज्यांमध्ये मालवाहने चालविण्यासाठी समुचित प्राधिकरणाने दिलेला परवाना असा आहे.
———
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २७ अन्वये वगळण्यात आले.