मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८७ :
तात्पुरते परवाने :
१) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि राज्य परिवहन प्राधिकरण पुढील कारणांसाठी परिवहन वाहनाचा तात्पुरता वापर करण्याचा अधिकार देण्यासाठी, कलम ८० मध्ये घालून दिलेली कार्यपद्धती न वापरता परवाने देऊ शकतील. हे परवाने, काहीही झाले तरी चार महिन्यांपेक्षा अधिक नसेल, अशा मर्यादित कालावधीसाठी अमलात राहतील. तात्पुरता वापर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे –
(a)क)अ) यात्रा आणि धार्मिक मेळावे यांसारख्या विशेष प्रसंगी उतारूंची ने-आण करणे, किंवा
(b)ख)ब) हंगामी कामधंदा, किंवा
(c)ग) क) विशिष्ट तात्पुरती गरज भागवणे, किंवा
(d)घ) ड) परवान्याच्या नवीकरणासंबंधीच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि राज्य परिवहन प्राधिकरण त्यास आवश्यक वाटेल अशी कोणतीही शर्त त्या परवान्याला जोडू शकतील;
परंतु, मालमोटारीच्या बाबतीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण किंवा प्रकरणपरत्वे राज्य परिवहन प्राधिकरण अपवादात्मक परिस्थितीत आणि कारणे लेखी नमूद करून चार महिन्यांपेक्षा अधिक, परंतु जास्तीत जास्त एक वर्षाच्या कालावधीसाठी परवाना देऊ शकेल.
२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अतंर्भूत केलेले असले तरी पुढील बाबतीत कोणत्याही मार्गासाठी किंवा क्षेत्रासाठी त्या पोट-कलमाखाली तात्पुरता परवाना देता येईल –
एक) एखाद्या न्यायालयाच्या किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाच्या परवाना देण्यास मनाई करणाऱ्या आदेशामुळे, कलम ७२ किंवा कलम ७४ किंवा कलम ७६ किंवा कलम ७९ खाली त्या मार्गाच्या किंवा क्षेत्राच्या संबंधात कोणताही परवाना देता येत नसेल, त्या बाबतीत परवाना देण्यास ज्या कालवधीसाठी अशा प्रकारे मनाई केलेली असेल, त्या कालावधीपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी, किंवा
दोन) त्या मार्गााच्या किंवा क्षेत्राच्या संबंधातील कोणत्याही वाहनाचा परवाना एखाद्या न्यायालयाने किंवा अन्य सक्षम प्राधिकरणाने स्थगित केल्यामुळे परिणामी त्या मार्गासाठी किंवा क्षेत्रासाठी कायदेशीर परवाना मिळालेले त्याच वर्गातील परिवहन वाहन नसेल त्या बाबतीत अथवा त्या मार्गासाठी किंवा क्षेत्रासाठी अशी वाहने पुरेशा संख्येने नसतील, त्या बाबतीत परवाना अशा प्रकारे स्थगित केलेल्या कालावधीपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी :
परंतु असे की, अशा प्रकारे तात्पुरते परवाने देण्यात आलेल्या परिवहन वाहनांची संख्या परवाना देण्यास मनाई करण्यात आलेल्या किंवा यथास्थिति, परवाना निलंबित करण्यात आलेल्या वाहनांच्या संख्येपेक्षा अधिक असता कामा नये.