मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८४ :
सर्व परवान्यांचा लागू असणाऱ्या शर्ती :
प्रत्येक परवान्याच्या शर्ती पुढीलप्रमाणे असतील-
(a)क)अ) परवाना ज्याच्याशी संबंधित असेल, त्या वाहनासोबत कलम ५६ खाली देण्यात आलेला योग्यतेबद्दलचा कायदेशीर दाखला किंवा प्रमाणपत्र असले पाहिजे आणि हा अधिनियम व त्याखाली केलेले नियम यांच्या आवश्यकतानुरूप सर्व काळ त्याची देखभाल करण्यात आली पाहिजे;
(b)ख)ब) परवाना ज्याच्याशी संबंधित असेल, ते वाहन या अधिनियमाखाली परवानगी असलेल्या वेगाहून अधिक वेगाने चालवता कामा नये;
(c)ग) क) कलम ६७ खाली काढलेल्या अधिसूचनेद्वारे केलेल्या कोणत्याही मनाईचे किंवा घातलेल्या निर्बंधाचे आणि त्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या कोणत्याही प्रवासभाड्याचे किंवा वाहणावळीचे परवान्याशी संबंधित असलेल्या वाहनाच्या बाबतीत पालन करण्यात आले पाहिजे;
(d)घ) ड) परवाना ज्याच्याशी संबंधित असेल ते वाहन कलम ५ च्या किंवा कलम ११३ च्या तरतुदींचे उल्लंघन करून चालवता कामा नये;
(e)ड)ई) चालकांच्या कामाच्या तासांवर या अधिनियमातील ज्या तरतुदी मर्यांदा घालतात, त्या तरतुदींचे वाहन ज्याच्याशी संबंधित असेल, अशा कोणत्याही एका किंवा अनेक वाहनांच्या बाबतीत पालन केले पाहिजे;
(f)च) फ) प्रकरण दहा, अकरा आणि बारा यांच्या तरतुदी परवानाधारकाला जेथवर लागू होतात तेथवर त्यांचे पालन केले पाहिजे; आणि
(g)छ)ग) परवाना ज्याच्याशी संबंधित असेल, अशा प्रत्येक वाहनावर सेवाचालकाचे (ऑपरेटरचे) नाव आणि पत्ता त्या वाहनाच्या बाह्य भागावर दोन्ही बाजूंना खिडकीच्या रेषेच्या खाली (परंतु) शक्य तितक्या उंचावर, ठळक अक्षरात, वाहनाच्या रंगावर ठळकपणे उठून दिसेल अशा रंगाने रंगवला पाहिजे किंवा अन्य प्रकारे पक्का बसवला पाहिजे.