Mv act 1988 कलम ८१ : परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८१ :
परवान्यांची मुदत व त्यांचे नुतनीकरण :
१) कलम ८७ खाली देण्यात आलेल्या तात्पुरत्या परवान्याव्यतिरिक्त अन्य परवाना किंवा कलम ८८ च्या पोट-कलम (८) खालील विशेष परवाना १.(तो देण्यात आल्याच्या किंवा त्याचे नुतनीकरण केल्याच्या तारखेपासून) पाच वर्षांच्या कालावधीसाठी अमलात राहील;
परंतु, कलम ८८ च्या पोट-कलम (१) अन्वये परवान्यावर प्रतिस्वाक्षरी करण्यात आलेली असेल, त्या बाबतीत अशी प्रतिस्वाक्षरी प्राथमिक परवाना कायदेशीर असेल, अशा कालावधीइतक्या मुदतीपर्यंत नुतनीकरण करावे न लागता अमलात राहील.
२) परवाना समाप्त होण्याच्या तारखेच्या किमान पंधरा दिवस आधि करण्यात आलेल्या अर्जावरून परवान्याचे नुतनीकरण करता येईल.
३) पोट-कलम (२) मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी विनिर्दिष्ट मुदतीत अर्ज करण्यास सबळ व पुरेशा कारणामुळे अर्जदारास प्रतिबंध झाला होता याबद्दल प्रकरणपरत्वे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाची खात्री पटल्यास त्याला वरील पोट-कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अंतिम तारखेनंतर परवान्याच्या नवीकरणासाठी आलेला अर्ज विचारात घेता येईल.
४) प्रकरणपरत्वे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाला परवान्याच्या नवीकरणासाठी आलेला अर्ज पुढीलपैकी एका किंवा अधिक कारणांवरून फेटाळता येईल; ती कारणे अशी-
(a)क)अ) अर्जावर विचार केला जाण्याच्या तारखेपूर्वी असलेली अर्जदाराची नादारी किंवा तीस दिवसांच्या कालावधीपर्यंत कर्जे न फेडल्यामुळे ती फेडण्यासाठी आलेले हुकूमनामे यावरून उघड झालेली अर्जदाराची आर्थिक स्थिती;
(b)ख)ब) अर्जावर विचार केला जाण्याच्या तारखेपूर्वीच्या पंधरा दिवसांपासून मोजलेल्या बारा महिन्यांच्या कालावधीत, अर्जदाराने चालविलेल्या टप्पा वाहन सेवेमुळे अर्जदाराने केलेल्या पुढीलपैकी कोणत्याही अपराधाबद्दल त्याला दोन किंवा अधिक वेळा शिक्षा झालेली आहे-
एक) कोणतेही वाहन;
१) अशा वाहनावर द्यावयाचा कर न भरता चालवणे;
२) कर भरण्यासाठी दिलेल्या सवलतीच्या मुदतीत असा कर न भरता चालविणे आणि त्यानंतर असे वाहन चालविण्याचे बंद करणे;
३) कोणत्याही अनधिकृत मार्गावर चालविणे;
दोन) अनधिकृत फेऱ्या करणे;
परंतु, खंड (ब) च्या प्रयोजनार्थ शिक्षांची संख्या मोजताना अपील प्राधिकरणाच्या हुकूमावरून तहकूब करण्यात आलेली कोणतीही शिक्षा विचारात घेतली जाणार नाही;
परंतु आणखी असे की, अर्जदाराला त्याचे म्हणणे मांडण्याची बंदी दिल्याशिवाय या पोट-कलमाखाली कोणताही अर्ज फेटाळता येणार नाही.
५) एखाद्या परवान्याची मुदत संपल्यानंतर या कलमाखाली त्याचे नुतनीकरण करण्यात आलेली असेल, त्या बाबतीत असे नुतनीकरण
परावानासमाप्तीच्या अशा दिनांकापासून अमलात येईल, मग कलम ८७ च्या खंड (ड) खाली तात्पुरता परवाना देण्यात आलेला असो किंवा नसो, आणि ज्या बाबतीत असा तात्पुरता परवाना दिलेला असेल, त्या बाबतीत अशा तात्पुरत्या परवान्यासाठी भरलेली फी परत करण्यात येईल.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply