Mv act 1988 कलम ८० : परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८० :
परवान्यांसाठी अर्ज करण्याची व परवाने देण्याची कार्यपद्धती :
१) कोणत्याही प्रकारच्या परवान्यासाठी कोणत्याही वेळी अर्ज करता येईल.
२) कोणत्याही प्रकारच्या परवान्यासाठी या अधिनियमान्वये कोणत्याही वेळी करण्यात आलेला मंजूर करण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरण १.(राज्य परिवहन प्राधिकरण किंवा कलम ६६ च्या पोट-कलम (१) मध्ये उल्लेखिलेले कोणतेही विहित प्राधिकरण) सामान्यत: नकार देणार नाही:
परंतु, अर्जानुसार कोणताही परवाना मंजूर करण्यामुळे राजपत्रातील कलम ७१ चे पोट-कलम (३), खंड (अ) खालील अधिसूचनेत निश्चित केलेल्या व विनिर्दिष्ट केलेल्या करारावरील गाड्यांची संख्येत वाढ होत असेल तर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण १.(राज्य परिवहन प्राधिकरण किंवा कलम ६६ च्या पोट-कलम (१) मध्ये उल्लेखिलेले कोणतेही विहित प्राधिकरण) अर्जास विनासोपस्कार नकार देऊ शकेल :
परंतु, आणखी असे की, या अधिनियमाखालील कोणत्याही प्रकारचा परवाना देण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जास प्रादेशिक परिवहन प्राधिकरण १.(राज्य परिवहन प्राधिकरण किंवा कलम ६६ च्या पोट-कलम (१) मध्ये उल्लेखिलेले कोणतेही विहित प्राधिकरण ) नकार देईल तेव्हा ते त्याच्या नकाराची कारणे अर्जदाराला लेखी कळवील आणि अर्जदाराला त्याची बाजू मांडण्याची संधी देईल.
३) तात्पुरत्या परवान्याखेरीज अन्य कोणत्याही परवान्याच्या शर्तींमध्ये एका किंवा अनेक मार्गांचा किंवा नवीन क्षेत्राचा समावेश करून किंवा तो परवाना लागू असलेल्या मार्गात किंवा क्षेत्रात बदल करून किंवा टप्पा वाहन परवान्याच्या बाबतीत फेऱ्यांची संख्या विनिर्दिष्ट कमाल मर्यादेपेक्षा अधिक वाढवून किंवा परवान्यात विनिर्दिष्ट केलेल्या एक किंवा अनेक मार्गांत किंवा क्षेत्रात फेरबदल करून, विस्तार करून किंवा त्यात कपात करून त्या शर्तींमध्ये फेरबदल करण्यासंबंधीचा अर्ज हा नवीन परवाना मिळण्यसाठी केलेला अर्ज असल्याचे मानण्यात येईल;
परंतु, जो टप्पा वाहन परवानाधारक कोणत्याही मार्गावरील एकमेव वाहतूक सेवा पुरवीत असेल, त्या परवानाधारकाने वाहनांची संख्या न वाढवता अशा सेवेतील फेऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी केलेला अर्ज वाढवता अशा सेवेतील फेऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी केलेला अर्ज नवीन परवान्यासाठी केलेला अर्ज मानण्याची आवश्यकता असणार नाही;
परंतु आणखी असे की,
एक) फेरबदल केल्यानंतर अंतिम स्थानकांमध्ये बदल होणार नाही आणि पेरबदलामुळे ठरवून दिलेले अंतर चोवीस किलोमीटरपेक्षा अधिक असणार नाही;
दोन) मार्गविस्ताराच्या बाबतीत, विस्तारामुळे वाढणारे अंतर अंतिम स्थानकांपासून चोवीस किलोमीटरपेक्षा अधिक असणार नाही;
दोन) मार्गविस्ताराच्या बाबतीत, विस्तारामुळे वाढणारे अंतर अंतिम स्थानकांपासून चोवीस किलोमीटरपेक्षा अधिक असणार नाही.
आणि अशा मर्यादांमधील असा कोणताही फेरबदल किंवा विस्तार हा, अशा फेरबदलामुळे जनतेची सोय होईल आणि मूळ मार्गाच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या बाबतीत अशा तèहेने बदल किंवा विस्तार करण्यात आल्यानंतर वेगळा परवाना देणे इष्ट नाही याबद्दल परिवहन प्राधिकरणाची खात्री झाल्यानंतरच करण्यात येईल.
४) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, १.(राज्य परिवहन प्राधिकरण किंवा कलम ६६ च्या पोट-कलम (१) मध्ये उल्लेखिलेले कोणतेही विहित प्राधिकरण) ते या संबंधात विनिर्दिष्ट करील अशा तारखेपूर्वी त्याने दिलेल्या कोणत्याही परवान्याऐवजी कलम ७२ किंवा कलम ७४ कलम किंवा कलम ७६ किंवा प्रकरणपरत्वे कलम ७९ च्या तरतुदींनुरूप असलेला नवीन परवाना सादर तारखेपूर्वी देऊ शकेल आणि जुना परवाना ज्या एका किंवा अनेक मार्गांसाठी किंवा क्षेत्रासाठी कायदेशीर होता त्याच एका किंवा अनेक मार्गांसाठी किंवा क्षेत्रासाठी कायदेशीर होता त्याच एका किंवा अनेक मार्गांसाठी किंवा त्या क्षेत्रासाठी नवीन परवाना कायदेशीर असेल;
परंतु जुन्या परवान्याला जी शर्त अधिच जोडलेली होती किंवा परवाना देण्यात आला त्या वेळी अमलात असलेल्या कायद्यानुसार जी शर्त जोडता आली असती त्या शर्तीखेरीज इतर कोणतीही शर्त नवीन परवान्याला परवानाधारकाच्या लेखी संमतीविना जोडता येणार नाही.
५) कलम ८१ मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले, तरी पोट-कलम (४) च्या तरतुदींखाली देण्यात आलेला परवाना, जुना परवाना आणखी जितक्या काळपर्यंत अमलात राहिला असता तितक्या काळापर्यंत त्याचे नवीकरण न करताही अमलात राहील.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply