Mv act 1988 कलम ७ : विवक्षित वाहनांसाठी शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्यावरील निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७ :
विवक्षित वाहनांसाठी शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्यावरील निर्बंध :
१.(१) कोणत्याही व्यक्तीला, किमान एक वर्ष हलके वाहन चालविण्याचे लायसन धारण केलेले असल्याशिवाय परिवहन वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन दिले जाणार नाही.)
२.(परंतु या पोट-कलमातील कोणतीही गोष्ट ई-गाडी किंवा ई रिक्षास लागू होणार नाही.)
२) अठरा वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला, अशी व्यक्ती जिच्याबरोबर राहते अशा व्यक्तीची लेखी संमती असल्याखेरीज चक्रण (गियर) नसलेली मोटार सायकल चालविण्याचे शिकाऊ दिले जाणार नाही.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१५ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ३ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply