मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७६ :
खाजगी सेवा वाहनांच्या परवान्यासाठी अर्ज :
१) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यानंतर त्या अर्जानुसार किंवा त्यात त्याला आवश्यक वाटतील असे फेरफार करून खाजगी सेवा वाहनाचा परवाना देऊ शकेल किंवा असा परवाना देण्याचे नाकारू शकेल :
परंतु, त्या अर्जामध्ये नमूद न केलेल्या अशा कोणत्याही क्षेत्राच्या किंवा मार्गाच्या संबंधात असा परवाना देता कामा नये.
२) मोटार वाहनाचा खाजगी सेवा वाहन म्हणून उपयोग करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठीच्या अर्जामध्ये पुढील तपशील असेल-
(a)क)अ) वाहनाचा प्रकार व आसनक्षमता;
(b)ख)ब) अर्ज ज्याच्या संबंधात असेल, ते क्षेत्र किंवा एक किंवा अधिक मार्ग;
(c)ग) क) भाड्याने किंवा मोबदला घेऊन किंवा अर्जदार करत असलेला व्यापार उदीम किंवा धंदा यासंबंधात असेल, त्याव्यतिरिक्त अन्य प्रकारे व्यक्तींची ने-आण करण्याचे प्रयोजन या वाहनाद्वारे ज्या रीतीने साध्य करण्याचा दावा केलेला असेल ती रीत; आणि
(d)घ) ड) विहित करण्यात येईल असा इतर कोणताही तपशील
३) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवाना देण्याचे ठरविल्यास ते, या अधिनियमाखाली करण्यात येतील अशा कोणत्याही नियमांच्या अधीन राहून त्या परवान्याला पुढीलपैकी कोणतीही एक किंवा अधिक शर्ती जोडू शकेल, त्या र्शी अशा-
एक) वाहनाचा उपयोग फक्त विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा विनिर्दिष्ट मार्गावर किंवा मार्गांवर करावा लागेल;
दोन) वाहनामधून वाहून नेता येतील इतक्या जास्तीत जास्त उतारूंची संख्या आणि इतक्या जास्तीत जास्त सामानाचे वजन;
तीन) किमान एक महिन्याची नोटीस देऊन नंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला-
(a)क)अ) परवान्याच्या शर्तींमध्ये फेरफार करता येतील;
(b)ख)ब) परवान्याला आणखी शर्ती जोडता येतील;
चार) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांची मान्यता असेल, त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत परवान्याच्या शर्तींना सोडून कोणतीही गोष्ट करता येणार नाही;
पाच) वाहनामध्ये आराम वा स्वच्छता यांचा दर्जा विनिर्दिष्ट दर्जानुरूप ठेवावा लागेल;
सहा) राज्य शासन वेळोवेळी ठरवून देईल अशी नियतकालिक विवरणे, आकडेवारी आणि इतर माहिती परवानाधारकाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला द्यावी लागेल;
सात) घालून देण्यात येतील अशा इतर कोणत्याही शर्ती;