मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७५ :
मोटार कॅब्ज भाड्याने देण्यासंबंधी योजना :
१) केंद्र सरकारला राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्याद्वारे एक योजना करता येईल. स्वत:च्या उपयोगासाठी १.(स्वत: किंवा चालकांमार्फत मोटार कॅब्ज किंवा मोटार सायकली चालवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मोटार कॅब्ज किंवा मोटार सायकली) भाड्याने देण्याच्या धंद्याचे व त्याच्याशी संबंधित बाबींचे नियमन करणे हे या योजनेचे प्रयोजन असेल.
२) पोटकलम (१) खाली तयार केलेल्या योजनेमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी तरतूद करता येईल; त्या बाबी अशा-
(a)क)अ) या योजनेखाली चालकांना लायसने देणे व अशा लायसनांचे नवीकरण व ती रद्द करणे;
(b)ख)ब) अर्जाचा नमुना व लायसनाचा नमुना आणि या नमुन्यामध्ये भरावयाचा तपशील;
(c)ग) क) अशा लायसनांच्या अर्जासोबत भरावयाची फी;
(d)घ)ड) अर्ज ज्यांच्याकडे करावयाचा ती प्राधिकरणे;
(e)ड)ई) ज्या शर्तींवर अशी लायसने देता येतील, त्यांचे नवीकरण करता येईल किंवा ती रद्द करता येतील त्या शर्ती;
(f)च)फ) अशी लायसने देण्याचे किंवा त्यांचे नवीकरण करण्याचे नाकारणाऱ्या आदेशाविरूद्ध करावयाची अपिले;
(g)छ)ग) ज्या शर्तींवर मोटार कॅब्ज भाड्याने देता येतील त्या शर्तीं;
(h)ज)ह) अभिलेख ठेवणे व अशा अभिलेखांची तपासणी करणे;
(i)झ)आय) या कलमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशश इतर बाबी.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.