Mv act 1988 कलम ६ : चालकाने लायसन धारण करण्यावरील निर्बंध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६ :
चालकाने लायसन धारण करण्यावरील निर्बंध :
१) त्यावेळी अमलात असणारे चालकाचे लायसन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, शिकाऊ व्यक्तीचे लायसन वगळता किंवा कलम १३९ अन्वये करण्यात आलेल्या नियमांनुसार एखाद्या दस्तऐवजात विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीला एखादे मोटार वाहन चालविण्यास प्राधिकृत करणाऱ्या दस्तऐवजांनुसार असेल त्याखेरजी अन्य कोणतेही चालकाचे लायसन धारण करता कामा नये.
२) चालकाचे लायसन किंवा शिकाऊ व्यक्तीचे लायसन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ते लायसन वापरण्याची इतर कोणत्याही व्यक्तीला परवानगी देता कामा नये.
३) चालकाचे लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीला ज्या वर्गाची वाहने चालविण्याचा प्राधिकार देण्यात आलेला असतो त्यात वाहनांच्या प्रकारांची भर घालण्यास, कलम ९ च्या पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली अधिकारिता असणाऱ्या प्राधिकरणाला या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही.

Leave a Reply