Mv act 1988 कलम ६८ : परिवहन प्राधिकरणे:

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६८ :
परिवहन प्राधिकरणे:
१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पोट-कलम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेले अधिकार वापरण्यासाठी व कामे पार पाडण्यासाठी एक राज्य परिवहन प्राधिकरण स्थापन करील व अशाच प्रकारे ते प्रादेशिक परिवहन प्राधिकरणे स्थापन करील व अशाच प्रकारे ते प्रादेशिक परिवहन प्राधिकरणे स्थापन करील आणि त्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बाबतीत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा संपूर्ण क्षेत्रामध्ये (या प्रकरणात ज्यांचा प्रदेश असा निर्देश केलेला आहे) या प्रकरणाद्वारे व त्याअन्वये निहित केलेले अधिकार वापरावे लागतील व कामे पार पाडावी लागतील.
परंतु, संघराज्याक्षेत्रामध्ये, प्रशासकास, कोणतेही परिवहन प्राधिकरण स्थापन करणे वर्जिता येईल.
२) राज्य परिवहन प्राधिकरण किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, न्यायिक अनुभव असलेला किंवा कोणत्याही कायद्याखालील अपील किंवा पुनरीक्षण प्राधिकारी म्हणून किंवा कोणताही आदेश देण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी सक्षम असलेला अभिनिर्णयन प्राधिकरी असा अध्यक्ष आणि राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बाबतीत चारपेक्षा अधिक नाहीत एवढ्या (मग त्या सरकारी असोत किंवा नसोत) व्यक्ती आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकणाच्या बाबतीत, राज्य शासनाला ज्यांची नियुक्त करणे योग्य वाटेल अशा जास्तीत जास्त दोन व्यक्ती (मग त्या सरकारी असोत किंवा नसोत) यांचे मिळून बनलेले असेल; परंतु, ज्या व्यक्तीचा कोणत्याही परिवहन उपक्रमात मालक किंवा कर्मचारी म्हणून किंवा अन्यथा कोणताही आर्थिक हितसंबंध असेल, अशी कोणतीही व्यक्ती राज्य किंवा प्रादेशिक परिवहनाचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येणार नाही किंवा तिचे सदस्यत्त्व चालू राहणार नाही आणि अशा कोणत्याही प्राधिकरणाचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिवहन उपक्रमामध्ये आर्थिक हितसंबंध संपादित केला असल्याची लेखी नोटीस राज्य शासनाला देऊन तिने ते पद रिकामे केले पाहिजे:
परंतु, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या किंवा, यथास्थिती, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सदस्यांपैकी कोणत्याही सदस्यास, अशा प्रादिकरणाच्या बैठकीमध्ये अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये, त्यास न्यायिक अनुभव नसला किंवा अपील किंवा पुनरीक्षण प्राधिकारी म्हणून अनुभव नसला तरीदेखील किंवा कोणत्याही कायद्याखाली कोणताही आदेश देणारे किंवा निर्णय घेण्यास सक्षम अधिनिर्णयन प्राधिकारी म्हणून अनुभव नसला तरीदेकील, या कलमातील कोणत्याही बाबीमुळे त्यास अध्यक्ष म्हणून काम पार पाडण्यास प्रतिबंध असणार नाही :
परंतु आणखी असे की, राज्य शासनाला-
एक) त्यास तसे करणे आवश्यक किंवा योग्य वाटल्यास, कोणत्याही प्रदेशासाठी केवळ एकाच सदस्याचे राज्य परिवहन प्राधिकरण किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण स्थापन करता येईल, परंतु त्याला न्यायिक किंवा अपील पुनरीक्षण प्राधिकारी म्हणून अनुभव असावा लागेल किंवा कोणत्याही कायद्याखालील कोणताही आदेश देण्यास किंवा कोणताही निर्णय घेण्यास सक्षम असेल, असा अभिनिर्णयन प्राधिकारी असावा लागेल.
दोन) या बाबतीत केलेल्या नियमामध्ये, अध्यक्षाच्या किंवा अन्य कोणत्याही सदस्याच्या अनुपस्थितीत अशा प्राधिकरणाचे काम चालविण्याबाबत तरतूद करता येईल आणि कोणत्याही स्वरूपाचे कामकाज कोणत्याही परिस्थितीत व पद्धतीने चालवले जाईल, ते विनिर्दिष्ट करता येईल;
परंतु तसेच की, (परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापन व कार्यान्वयन यांच्याशी प्रत्यक्षपणे संबंधित असलेला अधिकारी सोडून इतर) एखादी कर्मचारी ज्या शासनाच्या सेवेत आहे त्या शासनाचा परिवहन उपक्रमामध्ये आर्थिक हितसंबंध आहे किंवा त्याने एवढ्याच कारणावरून त्या शासकीय कर्मचाऱ्याला अशा कोणत्याही प्राधिकरणाचा सदस्य नियुक्त होण्यास किंवा त्याचे सदस्यत्व चालू राहण्यास या पोटकलमातील कोणत्याही गोष्टीमुळे बाध येते असा त्याचा अर्थ लावण्यात येणार नाही.
३) राज्य परिवहन प्राधिकरण आणि प्रत्येक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कलम ६७ खाली दिलेल्या प्रत्येक निदेशाची अंमलबाजवणी करतील आणि राज्य परिवहन प्राधिकरण, अशा निदेशांच्या अधीनतेने आणि या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये तरतूद केलेली असेल, त्याखेरीज अन्यथा संपूर्ण राज्यामध्ये पुढील अधिकारांचा वापर करील आणि कामे पार पाडील, म्हणजेच-
(a)क)अ) राज्यात कोणतेही प्रादेशिक परिवहन प्राधिकरण असल्यास त्यांची कार्ये व धोरणे यांमध्ये समन्वय साधणे व नियमन करणे;
(b)ख)ब) जेथे कोणतेही प्रादेशिक परिवहन नसेल, तेथे अशा परिवहनाची कार्ये पार पाडणे आणि त्यास योग्य वाटल्यास, दोन किंवा अधिक प्रदेशांना सामयिक असलेल्या कोणत्याही मार्गाच्या संबंधातील कर्तव्ये पार पाडणे;
(c)ग) क) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामधील सर्व विवाद मिटविणे व ज्यामुळे त्यांच्यात मतभिन्नता निर्माण होत असेल अशा बाबींच्या संबंधात निर्णय घेणे;
(ca)गक)१.(कअ) टप्पा वाहने चालविण्यासाठी शासनाने मार्ग निर्धारित करणे; आणि)
(d)घ)ड) विहित करण्यात येतील अशी इतर कामे पार पाडणे.
४) पोटकलम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करणे आणि कामे पार पाडणे या प्रयोजनांसाठी राज्य परिवहन प्राधिकरण, विहित करता येतील अशा शर्तींच्या अधीनतेने, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणास निदेश देईल, आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, या अधिनियमाखालील आपली कामे पार पाडीत असताना त्यांची अंमलबजावणी करील व ते त्यास मार्गदर्शक ठरतील.
५) राज्य परिवहन प्राधिकरण व कोणतेही प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कलम ९६ खाली केलेल्या नियमांद्वारे या बाबतीत प्राधिकृत करण्यात आले असेल, तर सदर नियमांद्वारे विहित करता येतील असे निर्बंध, मर्यादा व शर्ती यांच्या अधीनतेने आपले असे अधिकार व कामे अशा प्राधिकरणाकडे किंवा व्यक्तीकडे सोपवू शकेल.
——–
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply