मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६७ :
मार्ग परिवहनाचे नियंत्रण करण्याचे राज्य शासनाचे अधिकार :
१.(राज्य शासन निम्नलिखित बाबी विचारात घेऊन,-
(a)क)अ) मोटार परिवहनाच्या विकासामुळे जनतेचे, व्यापार आणि उद्योगधंद्यांचे होणार फायदे;
(b)ख) ब) रस्ते परिवहन व रेल्वे परिवहन यांचे समन्वयन करण्याची इष्टता;
(c)ग) क) रस्ते व्यवस्थेच्या èहासास प्रतिबंध करण्याची इष्टता, आणि
(d)घ) ड) परिवहन सेवा प्रदात्यांमध्ये प्रभावी स्पर्धेला प्रोत्साहन देणे,
वेळोवळी शासकीय राजपत्रातील अधिसूचने द्वारे राज्य परिवहन प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण दोघांनाही प्रवाशांची सुविधा, आर्थिक दृष्ट्या स्पर्धात्मक भाडे, गर्दीला प्रतिबंध करणे आणि रस्त्याच्या सुरक्षेसाठी निदेश देऊ शकेल)
२) टप्पा वाहन, करारावरील वाहने आणि मालवाहने यांसाठी प्रवासभाडे व वाहतूक आकार यासंबंधातील पोटकलम (१) खालील कोणत्याही निदेशामध्ये असे उपबंधित करता येईल की, टप्पा वाहने, करारावरील वाहने किंवा मालवाहने चालवणाऱ्या व्यक्तींना, प्रवासी किंवा प्रकरणपरत्वे, मालप्रेषक यांनी, प्रवासी व माल यांच्यावरील करारासंबंधातील त्या काळापुरत्या अ्रस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये देय असलेल्या कराचा असे प्रवासभाडे व वाहतूक आकार यामध्ये समावेश असेल :
२.(परंतु राज्य शासनल तिला योग्य वाटेल अशा शर्तींना अधीन रााहून, पोटकलम (१) च्या खंड (ड) मध्ये विनिर्दिष्ट केलेली उद्धिष्ट्ये साध्य करण्यासाठी या प्रकरणाला अधीन राहून सर्व किंवा काही उपबंधापासून सवलत देऊ शकेल.)
३.(३) या अधिनियमा काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाखाली दिलेले कोणतेही परमिट बदलू शकते किंवा माल आणि प्रवाशांची वाहतूक यासाठी योजना करु शकेल आणि अशा योजनेअंतर्गत परिवहन विकास आणि कार्यक्षमता होण्यासाठी लायसन देऊ शकेल –
(a)क)अ) शेवटच्या स्थानापर्यंत जोडणी;
(b)ख)ब) ग्रामीण भागातील परिवहन;
(c)ग) क) वाहतुकीमधील गर्दी कमी करणे;
(d)घ)ड) शहरी भागातील वाहतूकीत सुधारणा करणे;
(e)ङ)ई) रस्ताच्या उपयोग करणाऱ्यांची सुरक्षा;
(f)च)फ) वाहतुकीच्या मालमत्तेचा चांगला वापर;
(g)छ)ग) प्रतिस्पर्धा, उत्पादकता आणि दक्षता याकरवी क्षेत्रांतील आर्थिक सामथ्र्य यांची वाढ करणे;
(h)ज)ह) लोकांच्या प्रवेश योग्यता (जनतेचा वावर) आणि गतिशीलतेत वाढ;
(i)झ)आय) पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन;
(j)ञ)जे) उर्जा संवर्धनास प्रोत्साहन;
(k)ट) के) जीवनाची गुणवत्ता सुधारणे;
(l)ठ)एल) परिवहन पद्धतीमध्ये आणि परिवहन प्रणाली मध्ये एकत्रीकरण आणि जोडणींसे सवर्धन; आणि
(m)ड)एम) केन्द्र शासनाला योग्य वाटतील अशा इतर बाबी.
४) पोटकलम (३) खाली बनविलेली योजना यामध्ये आकारली जाणारी फी, अर्जाचा नमुना आणि लायसन देणे, यामध्ये लायसनचे नुतनीकरण, रद्दकरण, निलंबन किंवा उपांतरण, हे विनिर्दिष्ट करेल.)
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३१ अन्वये मूळ उपखंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३१ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.