मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६५ :
नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
१) राज्य शासनास, कलम ६४ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबींखेरीज या, प्रकरणामधील अन्य तरतुदी प्रभावी करण्याच्या प्रयोजनांसाठी नियम करता येतील.
२) पूवोक्त अधिकारांच्या सर्वसाधारणतेस बाध येऊ न देता अशा नियमांमध्ये पुढीलप्रमाणे तरतुदी करता येतील-
(a)क)अ) या प्रकरणाखाली दाखल करता येतील अशा अपिलांची कार्यवाही व सुनावणी (अशा अपिलांसंबंधी द्यावयाचे शुल्क व अशा शुल्काचा परतावा);
(b)ख)ब) नोंदणी व अन्य विहित प्राधिकरणांची नियुक्त, कामे व अधिकारक्षेत्र;
(c)ग) क) या प्रकरणाच्या सर्व किंवा कोणत्याही तरतुदींमधून रस्त्यांचे बांधकाम, दुरूस्त्या व रस्ते स्वच्छ करणे, यासाठी संपूर्णपणे तयार केलेल्या व वापरण्यात येणाऱ्या रोड-रोलर, ग्रेडर व इतर वाहनांना सूट देणे आणि अशी सूट देण्याबाबतच्या नियमाक शर्ती;
(d)घ) ड) नोंदणी व योग्यता प्रमाणपत्रे देणे किंवा त्यांचे नवीकरण करणे आणि हरवलेल्या, नष्ट झालेल्या किंवा काढलेल्या अशा प्रमाणपत्रांच्या जागी प्रमाणपत्रांच्या दुसऱ्या प्रती देणे;
(e)ड) ई) नोंदणी प्रमाणपत्रामध्ये असलेल्या स्थूल वाहन वजनाच्या संबंधातील तपशिलाच्या नोंदीमध्ये सुधारणा करण्यासाठी ती नोंदणी प्राधिकरणाकडे हजर करणे;
(f)च) फ) मोटार वाहनांची तात्पुरती नोंदणी आणि तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्रे व चिन्हे १.(कलम ४३ च्या परंतुकाला अधीन राहून) देणे;
(g)छ)ग) कलम ५८, पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेला तपशील व इतर विहित तपशील प्रदर्शित करावयाची पद्धती;
(h)ज) ह) या प्रकरणाखाली देय असलेले शुल्क किंवा त्याचा कोणताही भाग याच्या प्रदानापासून विहित वर्गातील व्यक्तींना सूट देणे;
(i)झ) आय) केंद्र सरकारद्वारे विहित करण्यात आले असतील त्याखेरजी या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे नमुने;
(j)ञ)जे) नोंदणी प्रमाणपत्रांचा तपशील नोंदणी प्राधिकरणांनी परस्परांना कळविणे आणि राज्याच्याबाहेर नोंदलेल्या वाहनांच्या मालकांनी अशा वाहनांचा व त्यांच्या नोंदणीचा तपशील कळविणे;
(k)ट) के) कलम ४१ चे पोट-कलम (१३), कलम ४७ चे पोट-कलम (६) किंवा कलम ४९ चे पोट-कलम (४) किंवा कलम ५० चे पोट-कलम (५) याखालील रक्कम किंवा रकमा;
(l)ठ) एल) योग्यता प्रमाणपत्राच्या नवीकरणासाठी आलेल्या अर्जावर विचार होईपर्यंत त्याच्या विधिग्राह्यतेची मुदत वाढविणे;
(m)ड) एम) विक्रेत्याच्या ताब्यातील मोटार वाहनांना या प्रकरणाच्या तरतुदींपासून सूट देणे, व सूट देण्यासंबंधातील शर्ती व शुल्क;
(n)ढ) एन) कलम ६२ खालील विवरण ज्या नमुन्यात व कालावधीच्या पाठवयाचे तो नमुना व कालावधी;
२.(***)
(p)त) पी) विहित करावयाची किंवा करता येईल अशी कोणतीही अन्य बाब.
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम २८ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम २८ अन्वये वगळण्यात आले.