मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६३ :
१.(मोटार वाहनांच्या राज्य नोंदवह्या बाळगणे :
प्रत्येक राज्य शासन, केन्द्र शासन विहित करील अ्रशा नमुन्यामध्ये राज्य मोटार वाहनांच्या संबंधात एक राज्य मोटार वाहनांची नोंदवही ठेवील, ज्यामध्ये निम्नलिखित गोष्टी अंतर्भूत असतील –
(a)क) अ) नोंदणी क्रमांक;
(b)ख) ब) निर्मितीचे वर्ष;
(c)ग) क) वर्ग व प्रकार;
(d)घ) ड) नोंदणीकृत मालकांची नावे व पत्ते ; आणि
(e)ङ) इ) केन्द्र शासन विहित करील असे अन्य तपशील.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २६ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.