मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६२ :
चोरीस गेलेल्या व पुन्हा ताब्यात घेतलेल्या मोटार वाहनांच्या संबंधातील माहिती पोलिसांनी राज्य परिवहन प्राधिकरणास कळविणे :
राज्य शासनास, सार्वजनिक हितास्तव तसे करणे आवश्यक व इष्ट वाटत असेल तर, (कोणत्याही पदनामाने संबोधण्यात येणाऱ्या) पोलीस महानिरीक्षकास आणि राज्य शासन या बाबतीत वनिर्दिष्ट करील. अशा इतर पोलीस अधिकाऱ्यास, चोरीस गेलेल्या वाहनाच्या संबंधात आणि ज्यांची पोलिसांना माहिती आहे, अशा पुन्हा ताब्यात घेतलेल्या मोटार वाहनांच्या संबंधात अशी विवरणह राज्य परिवहन प्राधिकरणास सादर करण्याचे निदेश देऊ शकेल आणि अशी विवरणे ज्या नमुन्यांतून द्यावयाची व ज्या कालावधीच्या आत द्यावयाची तो नमुना व कालावधी विहित करू शकेल.