मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५७ :
अपिले :
१.(१) कोणतीही व्यक्ती, कलमे ४१,४२,४३,४५,४७,४८,४९,५०,५२,५३,५५ किंवा ५६ याखाली नोंदणी प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे व्यथित झाली असेल तर तिला अशा आदेशाची नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, विहित प्राधिकरणाच्या आदेशाविरूद्ध अपील करता येईल.)
२) अपील प्राधिकरण, मूळ प्राधिकरणाकडे अपिलाची नोटीस पाठवील आणि मूळ प्राधिकरणास व अपीलकत्र्यास सुनावणीची संधी दिल्यानंतर, त्यास योग्य वाटेल असा आदेश देईल.
———
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम १७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.