Mv act 1988 कलम ५५ : नोंदणी रद्द करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५५ :
नोंदणी रद्द करणे :
१) एखादे मोटार वाहन नष्ट झाले असेल किंवा वापरासाठी कायमरीत्या अक्षम झाले असेल तर मालक, चौदा दिवसांच्या आत किंवा शक्य तेवढ्या लवकर, असे वाहन सर्वसाधारणपणे जेते ठेवण्यात येते अशी त्याची राहण्याची किंवा यथास्थिती, व्यवसायाची जागा ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये येते, त्या नोंदणी प्राधिकरणास हे वृत्त कळवील आणि त्या प्राधिकरणाकडे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र पाठवील.
२) नोंदणी प्राधिकरण ते मूळ नोंदणी प्राधिकरण असेल, तर नोंदणी व नोंदणी प्रमाणपत्र रद्द करील किंवा ते तसे नसेल, तर ते वृत्त व नोंदणी प्रमाणपत्र मूळ नोंदणी प्राधिकरणाकडे अग्रेषित करील व ते प्राधिकरण नोंदणी रद्द करील.
३) कोणतेही नोंदणी प्राधिकरणास, त्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये येणाऱ्या मोटार वाहनाची, राज्य शासनास आदेशाद्वारे नियुक्त करता येईल अशा प्राधिकरणाकडून तपासणी करण्याचे आदेश देता येतील आणि अशा तपासणीनंतर आणि मालक जे कोणतेही अभिवेदन करू इच्छित असेल, ते करण्याची त्याला (मालकाला नोंदणी प्रमाणपत्रात नमूद असेलेल्या त्याच्या पत्त्यावर पोचदेय नोंदणी डाकेने नोटीस पाठवून) संधी दिल्यानंतर, ते वाहन अशा स्थितीत आहे की, त्याचा वापर करणे शक्य नाही किंवा त्याच्या सार्वजनिक जागेतील वापरामूळे जनतेस धोका पोहोचू शकतो किंवा ते वाजवी दुरूस्तीच्या पलीकडे गेले आहे अशी नोंदणी प्राधिकरणाची खात्री झाल्यास, त्याला त्या वाहनाची नोंदणी रद्द करता येईल.
४) मोटार वाहन कायमरीत्या भारताबाहेर हलविण्यात आले आहे, याविषयी नोंदणी प्राधिकरणाची खात्री झाल्यास नोंदणी प्राधिकरण नोंदणी रद्द करील.
५) एखाद्या महत्त्वाच्या तपशिलाबाबत खोट्या दस्तऐवजाच्या आधारे किंवा अशा तपशिलाबाबत खोट्या गोष्टींचे अभिवेदन करून एखाद्या मोटार वाहनाची नोंदणी करवून घेतलेली आहे किंवा त्यावर उमटरेखित (एम्बोसड) केलेला इंजिन क्रमांक किंवा साटा क्रमांक, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या क्रमांकापेक्षा वेगळे आहेत, याविषयी नोंदणी प्राधिकरणाची खात्री झाल्यास, नोंदणी प्राधिकरण, मालकाला जर काही अभिवेदन करण्याची इच्छा असेल तर त्याला नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर पोचदेय नोंदणी डाकेने नोटीस पाठवून, त्याला तशी संधी दिल्यानंतर व त्याबाबतची कारणे लेखी नमूद करून वाहनाची नोंदणी रद्द करता येईल.
(5A)(५क) १.(५अ) कोणत्याही नोंदणी प्राधिकरणाला किंवा इतर प्राधिकृत प्राधिकरणाला विश्वास ठेवण्यास कारण असेल कि त्याच्या कार्यक्षेत्रामधध्ये कोणत्याही वाहनाचा उपयोग कलम १९९अ अन्वये शिक्षेस पात्र अपराध करण्यासाठी केला आहे, तर प्राधिकरण वाहनाच्या मालकाला लेखी प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल आणि तत्पश्चात एक वर्षासाठी वाहनाची नोंदणी रद्द करु शकेल :
परंतु मोटर वाहनाचा मालक कलम ४० आणि कलम ४१ मधील उपबंधाअन्वये नवीन नोंदणीसाठी अर्ज करु शकेल.)
६) कलम ५४ खाली किंवा या कलमाखाली मोटार वाहनाची नोंदणी रद्द करणारे नोंदणी प्राधिकरण हे वृत्त वाहनाच्या नोंदणी रद्द करणारे नोंदणी प्राधिकरण हे वृत्त वाहनाच्या मालकाला लेखी स्वरूपात कळवील आणि वाहनाचा मालक, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ त्या प्राधिकरणाच्या स्वाधीन करील.
७) कलम ५४ खाली किंवा या कलमाखाली नोंदणी रद्द करण्याचा आदेश देणारे नोंदणी प्राधिकरण, ते मूळ नोंदणी प्राधिकरण असेल तर नोंदणी प्रमाणपत्र आणि आपल्या अभिलेखातील त्या वाहनाच्या संबंधातील नोंद रद्द करील आणि ते मूळ नोंदणी प्राधिकरण नसेल तर त्या प्राधिकरणाकडे नोंदणी प्रमाणपत्र अग्रेषित करील आणि ते प्राधिकरण, नोंदणी प्रमाणपत्र आणि आपल्या अभिलेखातील मोटार वाहनाच्या संबंधातील नोंद रद्द करील.
८) या कलमातील आणि कलमे ४१, ४९, ५०, ५१, ५२, ५३ व ५४ यातील मूळ नोंदणी प्राधिकरण या संज्ञेचा अर्थ, ज्याच्या अभिलेखामध्ये वाहनाची नोंदणी करण्यात आली आहे ते नोंदणी प्राधिकरण, असा असेल.
९) या कलमातील नोंदणी प्रमाणपत्र यामध्ये, या अधिनियमातील तरतुदींअन्वये नवीकरण केलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचा समावेश असेल.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply