मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४ :
मोटार वाहन चालविण्याच्या संबंधातील वयाची मर्यादा :
१) अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक जागी एखादे मोटार वाहन चालविता कामा नये. परंतु, एखाद्या व्यक्तीला ती सोळा वर्षांची झाल्यांनरत १.(५० सीसी पेक्षा अधिक नाही आशा इंजिन क्षमतेची) मोटार सायकल सार्वजनिक जागी चालविता येईल.
२) कलम १८ च्या तरतुदींना अधीन राहून, वीस वर्षांच्यापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही सार्वजनिक जागी एखादे परिवहन वाहन चालविता कामा नये.
३) कोणत्याही व्यक्तीला, तिने ज्या प्रकारचे वाहन चालविण्याच्या लायसनासाठी अर्ज केला असेल त्या प्रकारचे वाहन चालविण्यास ती पात्र असल्याखेरजी या कलमाखालील शिकाऊ व्यक्तीसाठी लायसन किंवा चालकाचे लायसन देण्यात येणार नाही.
———-
१. १९९४ चा अधिनियम क्रमाकं ५४ याच्या कलम ३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.(१४ नोव्हेंबर १९९४ पासून).