मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४४ :
१.(नोंदणीच्या वेळी वाहन हजर करणे :
१) केन्द्र शासन विनिर्दिेष्ट करील अशा अटी व शर्तींना अधीन राहून, कोणत्याही अधिकृत विक्रत्याने मोटर वाहनाची विक्री केली असेल तर पहिल्यावेळी नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यासाठी मोटार वाहन हजर करण्याची जरुरी नसेल.
२) राज्य शासन विनिर्दिष्ट करील अशा अटी व शर्तींना अधीन राहून, ज्या व्यक्तीच्या नावाने नोंदणी प्रमाणपत्र दिले असेल, त्याने नोंदणी केलेले किंवा हस्तांतर केलेल वाहन नोंदणी प्राधिकरणाकडे हजर करण्याची जरुरी नसेल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १९ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.