मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४३ :
१.(तात्पुरती नोंदणी :
कलम ४० मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, मोटार वाहनाचा मालक राज्य शासनाने विहित केल्याप्रमाणे मोटार वाहनाचे तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि तात्पुरते नोंदणी चिन्ह मिळविण्यासाठी कोणत्याही नोंदणी प्राधिकरणाकडे किंवा अन्य प्राधिकरणाकडे अर्ज करेल आणि असे नोंदणी प्राधिकरणाचे तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि तात्पुरते नोंदणी चिन्ह केन्द्र शासनाने विहित केलेल्या नियमांना अनुसरुन असेल :
परंतु राज्य शासन विहित करेल अशा पद्धतीने अशा मोटार वाहणाची नोंदणी राज्यामध्ये तात्पुरती नोंदणी करु शकेल,
आणि नोंदणी प्रमाणपत्र आणि नोंदणीचे चिन्ह एक महिन्याच्या कालावधीसाठी असेल.)
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १८ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.