Mv act 1988 कलम ४२ : राजनैतिक अधिकारी इ. च्या मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष तरतूद :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४२ :
राजनैतिक अधिकारी इ. च्या मोटार वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष तरतूद :
१) मोटार वाहनाच्या नोंदणीसाठी कोणताही राजनैतिक अधिकारी किंवा वाणिज्यिक अधिकारी यांनी किंवा त्यांच्या वतीने, कलम ४१, पोट-कलम (१) खाली अर्ज केला असेल त्या बाबतीत, त्या कलमाच्या पोटकलम (३) किंवा पोट-कलम (६) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, नोंदणी प्राधिकरण, पोट-कलम (३) खाली यासंबंधात केंद्र सरकारने केलेल्या नियमांखाली केलेल्या तरतुदींप्रमाणे अश रीतीने व कार्यपद्धतीनुसार वाहनांची नोंदणी करील आणि त्या नियमांमध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार, त्या वाहनावर प्रदर्शित करण्यासाठी विशेष नोंदणी चिन्ह नेमून देईल आणि त्या वाहनाची या कलमाखाली नोंदणी करण्यात आलेली आहे अशा आशयाचे (या कलमामध्ये यानंतर याचा नोंदणी प्रमाणपत्र असा निर्देश केलेले) एक प्रमाणपत्र देईल, आणि अशा प्रकारे नोंदणी केलेल्या कोणत्याही वाहनाची, ते जोपर्यंत कोणत्याही राजनैतिक अधिकाऱ्याची किंवा वाणिज्यिक अधिकाऱ्याची मालमत्ता असेल तोपर्यंत, या अधिनियमाखाली अन्यथा नोंदणी करणे आवश्यक असणार नाही.
२) या कलमाखाली नोंदणी केलेले कोणतेही वाहन, कोणत्याही राजनैतिक अधिकाऱ्याची किंवा वाणिज्यिक अधिकाऱ्याची मालमत्ता असण्याचे बंद झाल्यास, या कलमाखाली देण्यात आलेले प्रमाणपत्रदेखील प्रभावी राहणार नाही व त्यांनरत कलमे ३९ व ४० च्या तरतुदी लागू होतील.
३) केंद्र सरकारला, राजनैतिक अधिकारी व वाणिज्यिक अधिकारी यांच्या वाहनांच्या नोंदणीसाठी, नोंदणी प्राधिकरणाने अशा वाहनांच्या नोंदणी करतेवेळी अनुसरावयाची कार्यपद्धती, अशा वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र ज्या नमुन्यातून द्यावयाचे तो नमुना, मालकाकडे अशा वाहनांची नोंदणी प्रमाणपत्रे पाठवावयाची पद्धती आणि अशा वाहनांना नेमून द्यावयाचे विशेष नोंदणी चिन्हे, यासंबंधात नियम करता येतील.
४) या कलमाच्या प्रयोजनासाठी राजनैतिक अधिकारी किंवा वाणिज्यिक अधिकारी याचा अर्थ, केंद्र सरकारने या बाबतीत मान्यता दिलेली कोणतीही व्यक्ती असा असेल, व एखादी व्यक्ती असा अधिकारी आहे किंवा नाही असा कोणातही प्रश्न निर्माण झाल्यास, त्यावरील केंद्र सरकारचा निर्णय अंतिम राहील.

Leave a Reply