Mv act 1988 कलम ३९ : नोंदणीची आवश्यकता :

मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ४ :
मोटार वाहनांची नोंदणी :
कलम ३९ :
नोंदणीची आवश्यकता :
कोणत्याही वाहनाची या प्रकरणानुसार नोंदणी करण्यात आल्याशिवाय आणि वाहनाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द करण्यात आले नसेल त्याखेरीज आणि वाहनावर विहित पद्धतीने नोंदणी चिन्ह लावण्यात आले असेल त्याखेरीज, कोणतीही व्यक्ती, कोणतेही मोटार वाहन चालवणार नाही किंवा कोणतीही मोटार वाहन मालक कोणत्याही सार्वाजनिक जागी किंवा कोणत्याही अन्य जागी ते वाहन चालविण्यास देणार नाही किंवा तशी परवानगी देणार नाही :
परंतु, केंद्र सरकारकडून विहित करण्यात येतील अशा शर्तींच्या अधीनतेने विक्रेत्याच्या कब्जात असलेल्या मोटार वाहनांना या कलमातील कोणतीही बाब लागू होणार नाही.

Leave a Reply