मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३८ :
नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
१) या प्रकरणातील तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनास नियम करता येतील.
२) यापूर्वीच्या अधिकारांच्या सर्वसाधारणतेस कोणताही बाध येऊ न देता, अशा नियमात पुढील बाबींसाठी तरतुदी करता येतील.
(a)क)अ) या प्रकरणाखालील, लायसन देणाऱ्या प्राधिकरणाची व अन्य विहित विहित प्राधिकरणांची नियुक्त, अधिकारिता, नियंत्रण व कामे;
(b)ख)ब) ज्या शर्तींच्या अधीनतेने, टप्पा वाहनांचे चालक वाहकाची कामे पार पाडत असतील आणि वाहक म्हणून काम पाहण्यासाठी तात्पुरते नेमलेल्या व्यक्तींना कलम २९ च्या पोट-कलम (१) खालील तरतुदींमधून सूट देता येईल, अशा शर्ती;
(c)ग) क) वाहकांची किमान शैक्षणिक अर्हता, त्यांची कर्तव्ये व कामे व ज्यांना वाहकाचे लायसन देण्यात आलेले आहे अशा व्यक्तीची वर्तणूक :
(d)घ) ड) वाहकाचे लायसन मिळण्यासाठी किंवा अशा लायसनचे नवीकरण करण्यासाठी अर्जाचा नमुना व त्यात भरावयाचा तपशील;
(e)ड)ई) वाहकाचे लायसन देता येईल किंवा त्याचे नवीकरण करता येईल असा नमुना व त्यात समाविष्ट असलेला तपशील;
(f)च) फ) हरवलेल्या, नष्ट झालेल्या किंवा फाटलेल्या लायसनच्या जागी लायसनची दुसरी प्रत देणे, जुन्या झालेल्या छायाचित्रांच्या जागी नवीन छायाचित्रे पुन:स्थापित करणे व त्याबाबत आकारावयाचे शुल्क;
(g)छ)ग) या प्रकरणाखालील दाखल करण्यात येतील अशी अपिले चालविणे व त्यांची सुनावणी, अशा अपिलांसाठी द्यावयाचे शुल्क व अशा शुल्काचे परवाना;
परंतु, अशा प्रकारे निश्चित करण्यात आलेली कोणतीही शुल्काची रक्कम पंचवीस रूपयांहून अधिक असणार नाही.
(h)ज) ह) टप्पा वाहनांच्या वाहनांनी धारण करावयाचे बिल्ले व गणवेश व अशा बिल्ल्यांच्या संबंधात भरावयाचे शुल्क;
(i)झ) आय) नोंदणीकृत वैद्यक व्यवसायींनी, कलम ३०, पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट केलेली प्रमाणपत्रे देणे व अशा प्रमाणपत्रांचा नमुना;
(j)ञ) जे) ज्या शर्तींच्या अधीनतेने व मर्यादेपर्यंत, अन्य राज्यांमध्य देण्यात आलेले वाहकाचे (कंडक्टर) लायसन राज्यात प्रभावी असेल, त्या शर्ती व मर्यादा;
(k)ट) के) एका प्राधिकरणाने दुसऱ्या प्राधिकरणाकडे वाहकाच्या लायसनांचा तपशील कळविणे; आणि
(l)ठ) एल) विहित करावयाची किंवा विहित करता येईल अशी इतर कोणतीही बाब.