मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३६ :
प्रकरण दोनमधील विवक्षित तरतुदी वाहकाच्या (कंडक्टर) लायसनला लागू असणे :
कलम ६ चे पोट-कलम (२), कलमे १४, १५ व २३, कलम २४ चे पोट-कलम (१) व कलम २५ यांतील तरतुदी, शक्य तेथवर, त्या जशा चालकाच्या लायसनला लागू होतात त्याप्रमाणे वाहकाच्या लायसनच्या संबंधात लागू होतील.