Mv act 1988 कलम ३२ : रोग किंवा विकलांगता या कारणास्तव वाहकाचे (कंडक्टर) लायसन रद्द करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३२ :
रोग किंवा विकलांगता या कारणास्तव वाहकाचे (कंडक्टर) लायसन रद्द करणे :
लायसन धारक, ज्यामुळे तो असे लायसन धारण करण्यास कायमचा अक्षम ठरण्याची शक्यता आहे अशा रोगाने ग्रासलेला आहे किंवा विकलांगता आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी लायसन देणाऱ्या प्राधिकरणास समुचित कारण असल्यास त्या प्राधिकरणास ते लायसन कोणत्याही वेळी रद्द करता येईल आणि लायसन रद्द करणारे प्राधिकरण हे लायसन देणारे प्राधिकरण नसेल अशाबाबतीत ज्या प्राधिकरणाने असे लायसन दिले त्या प्राधिकरणास अशाप्रकारे ते रद्द करण्यात आल्याची वस्तुस्थिती कळवील;
परंतु, कोणतेही लायसन रद्द करण्यापूर्वी लायसन देणारे प्राधिकरण, लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीला सुनावणीची उचित संधी देईल.

Leave a Reply