Mv act 1988 कलम २ : व्याख्या :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २ :
व्याख्या :
संदर्भानुसार अन्य अर्थ अपेक्षित नसल्यास या अधिनियमात-
१.(१) रुपांतरित वाहन (अ‍ॅडप्टेड व्हेईकल) म्हणजे एकतर खास डिझाइन केलेले आणि तयार केलेले किंवा ज्यामध्ये, कोणताही शारीरिक दोष किंवा अंपगत्वाने पीडित असलेल्या व्यक्तीच्या वापरासाठी कलम ५२ च्या पोटकलम (२) अंतर्गत परिवर्तित केले गेलेले, आणि त्याचा अशा व्यक्ति द्वारा किंवा केवळ त्याच्या वापरासाठी उपयोग केला जातो.
(1A)१क) १अ) समूहक (एकत्रीकरण करणारा / अ‍ॅग्रिगेटर) म्हणजे प्रवासी वाहतुकीच्या उद्देशाने डड्ढायव्हरशी संपर्क साधण्यासाठी डिजिटल मध्यस्थ किंवा बाजारपेठ.
(1B)१ख) १ब) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदींच्या संदर्भात क्षेत्र म्हणजे राज्य सरकार तरतुदींच्या आवश्यकता लक्षात घेऊन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करु शकेल असे क्षेत्र.)
२) आर्टिक्युलेटड वाहन म्हणजे, ज्याला अर्थ-अनुयान जोडण्यात आलेले आहे असे मोटार वाहन;
३) अक्षबंध वजन म्हणजे, वाहनाच्या अक्षबंधाच्या संबंधात, त्या अक्षबंधाला, जोडलेल्या अनेक चाकांद्वारे वाहन ज्या पृष्ठभागावर उभे असेल, त्या पृष्ठभागाकडे पारेषित करण्यात आलेले एकूण वजन;
४) नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे, प्रकरण चारच्या तरतुदींनुसार मोटार वाहनाची योग्य रीतीने नोंदणी करण्यात आलेली आहे अशा आशयाचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र;
4A)४क) २.(४अ) सामुदायिक सेवा (कम्युनिटि सव्र्हिस) म्हणजे एखाद्या व्यक्तीने या अधिनियमान्वये केलेल्या एखाद्या अपराधासाठी दंड किंवा शिक्षा म्हणून केले जाणारे विनामूल्य कार्य अपेक्षित आहे.)
५) वाहक म्हणजे, टप्पा वाहनाच्या संबंधात प्रवाशांकडून भाडे गोळा करण्यासाठी आणि त्या टप्पा वाहनात चढणे आणि विहित करण्यात येतील अशी इतर कार्ये पार पाडण्यासाठी कामावर लावण्यात आलेली व्यक्ती;
६) करारावरील वाहन म्हणजे एका प्रवाशाला किंवा अनेक प्रवाशांना भाड्याने किंवा मोबोदल्यावर वाहून नेणारे आणि एखाद्या व्यक्तीने अशा वाहनाच्या संबंधातील परवाना धारकाबरोबर किंवा त्याने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या व्यक्तीबरोबर केलेल्या कंत्राटाद्वारे निश्चित किंवा त्याने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या व्यक्तीबरोबर केलेल्या कंत्राटाद्वारे निश्चित किंवा मान्य करण्यात आलेल्या दराने किंवा रकमेवर –
(a)क) अ) समय तत्त्वावर, मग त्यामध्ये एखाद्या मार्गाचा किंवा अंतराचा उल्लेख अथवा नसो-किंवा
(b)ख) ब) एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत, दोन्ही बाबतीत, कंत्राटामध्ये अंतर्भूत नसलेल्या प्रवशांना चढण्यसाठी किंवा उतरण्यासाठी प्रवासात कोठेही न थांबता प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी अशा वाहनाचा वापर करण्यसाठी केलेल्या स्पष्ट किंवा गर्भित कंत्राटान्वये नेमण्यात आलेले मोटार वाहन, आणि यात –
एक) मॅक्सी-कॅब; आणि
दोन) मोटार कॅब-त्याच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र आकार घेण्यात येत असला तरीही- यांचा समावेश होतो.
८) व्यापारी यामध्ये;
३.(***)
(b)ख) ब) साट्याला (चेसीस) जोडण्यासाठी सांगडा (बॉडी) तयार करण्यामध्ये; किंवा
(c)ग) क) मोटार वाहनाच्या दुरूस्तीमध्ये; किंवा-
(d)घ) ड) मोटार गाड्या तारण-गहाणावर, भाडेपट्टाने किंवा भाडे खरेदीवर देण्याच्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या व्यक्तीचा समावेश होतो,
९) चालक यामध्ये, दुसऱ्या मोटार वाहनाद्वारे ओढून नेल्या जाणाऱ्या मोटार वाहनाच्या बाबतीत, ओढून जाणाऱ्या वाहनाचा स्टीअरमॅन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश होतो;
9A)९क) ४.(९अ) चालक पुनश्चर्या प्रशिक्षण पाठ्यक्रम (डड्ढायव्हर रिफे्रशर ट्रेनिंग कोर्स) म्हणजे कलम १९ च्या पोटकलम (२अ) मध्ये निर्दिष्ट केलेला पाठ्यक्रम अभिप्रेत आहे.)
१०) चालकाचे लायसन म्हणजे, सक्षम प्राधिकरणाने प्रकरण दोन अन्वये दिलेले, त्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीला, शिकाऊ म्हणून नाती तर अन्य प्रकारे एखादे मोटार वाहन किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट प्रकारचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्यास प्राधिकृत करणारे लायसन;
११) शैक्षणिक संस्था बस म्हणजे, एखाद्या कॉलेजच्या, शाळेच्या किंवा अन्य शैक्षणिक संस्थेच्या मालकीची आणि त्यांच्या कोणत्याही कृतींच्या संबंधात त्या शैक्षणिक संस्थेच्या विद्याथ्र्यांची किंवा कर्मचारी ने-आण करण्याच्याच केवळ प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी ओम्नीबस;
१२) भाडे यामध्ये, हंगामी तिकिटासाठी किंवा कंत्राटी वाहनाचे भाडे म्हणून देय रकमेच्या समावेश होतो;
12A)१२क) ५.(१२अ) सुवर्ण तास (गोल्डन आवर) याचा अर्थ अत्यंत क्लेशकारक दुखापत झाल्यानंतर एक तासाचा कालावधी अभिप्रेत आहे ज्या दरम्यान त्वरित वैद्यकीय सेवा प्रदान करुन मृत्यूपासून बचाव करण्याची सर्वाधिक शक्यता असते.
१३) माल यामध्ये, पशुधन आणि जिवंत व्यक्तींखेरीज वाहून नेण्यात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा (वाहनाबरोबर सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारी साधनसामग्री वगळून) अंतर्भाव होतो; मात्र यामध्ये मोटार गाडीतून किंवा मोटार गाडीला जोडलेल्या अनुयानामधून (ट्रेलर) वाहून नेण्यात येणाऱ्या सामानाचा आणि वैयक्तिक चीजवस्तूंचा आणि त्या वाहनामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वैयक्तिक सामानाचा समावेश होत नाही;
१४) माल मोटार म्हणजे, फक्त माल वाहून नेण्यासाठीच बांधण्यात आलेले किंवा त्या वापरासाठी स्वीकारण्यात आलेले कोणतेही मोटार वाहन किंवा जेव्हा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आले तेव्हा त्या प्रयोजनासाठी तयार करण्यात किंवा जुळवून घेण्यात आले नव्हते असे कोणतेही मोटार वाहन;
१५) स्थूल वाहन वजन म्हणजे, कोणत्याही वाहनाच्या बाबतीत, वाहनाचे एकूण वजन आणि त्या वाहनासाठी अनुज्ञेय म्हणून नोंदणी प्राधिकरणाने प्रमाणित केलला आणि नोंदणी केलेला भार;
१६) अवजड माल वाहन म्हणजे, ज्या मालगाडीचे स्थूल वजन किंवा ट्रॅक्टरचे किंवा रोड-रोलरचे रिकामा असतानाचे वजन १२,००० किलोग्रॅमपेक्षा अधिक आहे असे वाहन;
१७) अवजड प्रवासी मोटार वाहन म्हणजे, ज्याचे स्थूल वजन १२,००० किलोग्रॅमपेक्षा अधिक आहे असे कोणतेही सार्वजनिक सेवा वाहन किंवा खाजगी सेवा वाहन किंवा शैक्षणिक संस्थेची बस किंवा ओम्नीबस किंवा जिथे रिकाम्या स्थितीतले वजन १२,००० किलोग्रॅमपेक्षा अधिक आहे अशी मोटार गाडी;
६.(***)
१९) शिकाऊ व्यक्तीसाठी लायसन म्हणजे, सक्षम प्राधिकरणाने प्रकरण दोन अन्वये दिलेले आणि त्यामध्ये शिकाऊ म्हणून एखादे मोटार वाहन किंवा कोणतेही विनिर्दिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्यासाठी एखाद्या व्यक्तीला विनिर्दिष्ट करण्यात आले असेल असे लायसन;
२०) लायसन देणारे प्राधिकरण म्हणजे, प्रकरण दोन किंवा यथास्थिति, प्रकरण तीन खालील लायसन देण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकरण;
२१) हलके मोटार वाहन म्हणजे, परिवहन वाहन किंवा ओम्नीबस यांपैकी प्रत्येकाचे स्थूल वजन किंवा मोटारकार, ट्रॅक्टर किंवा रोड रोलर यांपैकी कोणाचेही भारविरहित वजन ७.(७,५००) किलोग्रॅमपेक्षा अधिक नसेल असे वाहन;
21A)२१क)८.(२१ अ) निर्माता म्हणजे, मोटार वाहने निर्माण करण्याच्या व्यवसायात असलेली व्यक्ती;)
२२) मॅक्सी कॅब म्हणजे, चालक वगळता सहापेक्षा अधिक परंतू बारापेक्षा अधिक नाहीत इतके प्रवासी भाड्याने किंवा मोबदल्यावर वाहून नेण्यासाठी तयार करण्यात किंवा जुळवून घेण्यात आले असेल असे कोणतेही मोटार वाहन;
२३) मध्यम मालवाहू मोटार म्हणजे, हलके मोटार वाहन किंवा अवजड मालमोटार याव्यतिरिक्त अन्य अशी कोणतीही मालमोटार;
२४) मध्यम प्रवासी मोटार वाहन म्हणजे, मोटार सायकल, ९.(रुपांतरित वाहन (अ‍ॅडप्टेड वाहन)), हलके मोटार वाहन किंवा अवजड म्हणजे, मोटार वाहन याव्यतिरिक्त कोणतेही सार्वजनिक सेवा वाहन किंवा खाजगी सेवा वाहन किंवा शैक्षणिक संस्था बस;
२५) मोटार कॅब म्हणजे, चालकावयतिरिक्त सहापेक्षा अधिक नाहीत इतक्या उतारूंना भाड्याने किंवा मोबदल्यावर वाहून नेण्यासाठी तयार करण्यात किंवा जुळवून घेण्यात आले असेल असे कोणतेही मोटार वाहन;
२६) मोटार कार म्हणजे, परिवहन वाहन, ओम्नीबस, रोड-रोलर, ट्रक्टर, मोटार सायकल किंवा १०.(रुपांतरित वाहन (अ‍ॅडप्टेड वाहन)) यांखेरीज अन्य असे कोणतेही मोटार वाहन;
२७) मोटार सायकल म्हणजे, दोन चाकी मोटार वाहन व त्यामध्ये, जादा चाके असलेल्या, मोटार वाहनाला जोडण्यात आलेल्या अलग करता येण्याजोग्या कोणत्याही साईड कारचा समावेश होतो.
२८) मोटार वाहन किंवा वाहन म्हणजे, रस्त्यावर वापरण्यासाठी जुळते करून घेण्यात आलेले, यंत्राच्या मदतीने पुढे चालविण्यात येणारे कोणतेही वाहन-अशा चालविण्यासाठी वापरण्यात येणारी शक्ती अंतर्गत मार्गाने पारेषित करण्या तयेत असो वा बाह्य साधनमार्गाने पारेषित करण्यात येत असो-आणि यामध्ये, गाडीचा सांगाडा जोडण्यात आलेला नसेल असा साटा आणि ट्रेलर यांचा समावेश होतो, परंतु, स्थिर रूळावरून धावणाऱ्या वाहनाचा किंवा कारखान्यामध्ये किंवा इतर कोणत्याही बंदिस्त जागेतच फक्त वापरण्यासाठी जुळते करून घेतलेल्या वाहनाचा किंवा ज्याची क्षमता ११.(पंचवीस) घन सेंटीमीटरपेक्षा अधिक नाही अशा इंजिनाला जोडण्यात आलेल्या चार पेक्षा कमी चाके असलेल्या वाहनाचा यात समावेश होत नाही;
२९) ओम्नीबर म्हणजे, चालक वागळून सहापेक्षा अधिक व्यक्तींची ने-आण करण्यासाठी तयार करण्यात किंवा जुळते करून घेण्यात आलेले कोणतेही मोटार वाहन;
३०) मालक म्हणजे, ज्या व्यक्तीच्या नावे मोटार वाहनाची नोंदणी करण्यात आलेली असेल अशी व्यक्ती; आणि अशी व्यक्ती अज्ञान असेल तर अशा अज्ञान व्यक्तीचे पालक आणि भाडे-खरेदीवरील, करारावरील, किंवा भाडेपट्ट्याच्या करारावरील किंवा तारणगहाणाच्या करारावरील मोटार वाहनाच्या बाबतीत त्या कराराखालील वाहन जिच्या ताब्यात असेल अशी व्यक्ती;
३१) परवाना म्हणजे, राज्य किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने किंवा एखादे मोटार वाहन परिवहन वाहन म्हणून वापरण्यासाठी प्राधिकृत करण्यासाठी या अधिनियमाखाली या बाबतीत विहित करण्यात आलेल्या प्राधिकरणाने दिलेला परवाना;
३२) विहित म्हणजे, या अधिनियमाखाली करण्यात आलेल्या नियमांद्वारे विहित करण्यात आलेले.
३३) खाजगी सेवा वाहन म्हणजे, चालक वगळून सहापेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात किवा जुळवून घेण्यात आलेले सर्वसाधारणपणे अशा वाहनाच्या मालकाकडून किंवा त्याच्या वतीने त्याच्या व्यापार किंवा कामधंद्यासाठी किंवा त्याच्या संबंधात आणि भाड्याने किंवा मोबदल्यावर नाही अशाप्रकारे लोकांची ने-आण करण्याच्या प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे मोटार वाहन मात्र यामध्ये, सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटार वाहनाचा समावेश होत नाही.
३४) सार्वजनिक ठिकाण म्हणजे लोकांना प्रवेश करण्याची मुभा असते असा एखादा रस्ता, मार्ग, वाट किंवा इतर ठिकाण मग असे ठिकाण आमरस्ता असो अथवा नसो-आणि यामध्ये टप्पा वाहनांमध्ये प्रवाशांना जेथे उतरविण्यात येते किंवा गाडीत घेण्यात येते अशा ठिकाणाचा किंवा थांब्याचा समावेश होतो.
३५) लोकसेवा वाहन म्हणजे प्रवाशांची भाड्याने किंवा मोबदल्यावर ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारे किंवा वापरण्यासाठी अनुरूप करून घेण्यात आलेले कोणतेही वाहन; आणि यामध्ये मॅक्सी कॅब, मोटार कॅब, करारावरी वाहन आणि टप्पा वाहन यांचा समावेश होतो;
३६) नोंदणीकृत अक्षबंध वजन म्हणजे, कोणत्याही वाहनाच्या अक्षबंधाच्या संबंधात, त्या अक्षबंधाला अनुज्ञेय म्हणून नोंदणी करणाऱ्या प्राधिकरणाने प्रमाणित केलेले आणि नोंदणी केलेले अक्षबंध वजन;
३७) नोंदणी करणारे प्राधिकरण म्हणजे, प्रकरण चार अन्वये वाहनाची नोंदणी करण्याबाबतचे आधिकार प्रदान करण्यात आलेले प्राधिकरण;
३८) मार्ग म्हणजे, एखाद्या वाहनाला एका विरामस्थानापासून दुसऱ्या विरामस्थानापर्यंत ज्या महामार्गावरून जाता येईल तो विनिर्दिष्ट करणारी प्रवास रेषा;
38A)३८क)१२.(३८अ) योजना (स्कीम) म्हणजे या अधिनियमांतर्गत तयार केलेली योजना;
१३.(३९) सेमि-ट्रेलर म्हणजे जे यांत्रिकपणे पुढे ढकलले न जाणारे, एखाद्या मोटार वाहनाला जोडण्याच्या उद्देश असलेले आणि जे अशा प्रकारे बांधण्यात आले आहे की त्याचा काही भाग त्या मोटार वाहनावर बसवलेला आहे आणि काही भागाचे वजन त्या वाहनाकडून वाहण्यात येते असे (ट्रेलरखेरजी अन्य) वाहन;)
४०) टप्पा वाहन म्हणजे, चालक वगळून सहापेक्षा अधिक प्रवाशांना भाड्याने किंवा मोबदल्यावर संपूर्ण प्रवासासाठी किंवा प्रवाशाच्या टप्प्यासाठी प्रत्येक प्रवाशासाठी किंवा प्रत्येक प्रवाशाकडून स्वतंत्र भाडे देण्यात येऊन त्यांना वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेले किंवा त्यासाठी अनुरूप करून घेण्यात आलेले वाहन.
४१) राज्य शासन म्हणजे संघराज्य क्षेत्राच्या संबंधात संविधानाच्या अनुच्छेद २३९ अन्वये त्याच्यासाठी नेमण्यात आलेला प्रशासक;
४२) राज्य परिवहन उपक्रम म्हणजे, असा उपक्रम-
एक) केंद्र शासनाकडून किंवा एखाद्या राज्य शासनाकडून चालविण्यात येतो;
दोन)मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम, १९५० (१९५० चा ६४) च्या कलम ३ नुसार स्थापन करण्यात आलेल्या कोणत्याही मार्ग परिवहन महामंडळाकडून चालविण्यात येतो;
तीन) कोणतीही नगरपालिका किंवा कोणतेही महामंडळ किंवा केंद्र शासनाच्या किंवा अधिक राज्य शासनांच्या किंवा केंद्र शासनाच्या आणि एका किंवा अधिक राज्य शासनांच्या मालकीची किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील कंपनी यांच्याकडून चालविण्यात येतो;
१४.(चार) जिल्हा परिषद किंवा अशा प्रकारच्या इतर कोणतेही स्थानिक प्राधिकारी;)
स्पष्टीकरण : या खंडाच्या प्रयोजनासाठी मार्ग परिवहन सेवा म्हणजे, प्रवाशांची किंवा मालाची किंवा दोन्हींही रस्त्यांवरून भाड्याने किंवा मोबदल्यासाठी ने-आण करणारी मोटार वाहन सेवा;
42A)४२क)१५.(४२अ) परीक्षण अभिकरण (टेस्टींग एजन्सी म्हणजे कलम ११०ब च्या अधीन परीक्षण अभिकरण म्हणून नियुक्त केलेली संस्था (निकाय);
४३) पर्यटक वाहन म्हणजे, या बाबतीत विहित, या बाबतीत विहित करण्यात आले असतील अशा विनिर्देशांनुसार तयार करण्यात, किंवा जुळवून घेण्यात आणि सुसज्ज करण्यात आणि व्यवस्था ठेवण्यात आलेले करारावरील वाहन;
४४) ट्रॅक्टर म्हणजे कोणताही भार वाहून नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात न आलेले मोटार वाहन (पुढे ढकलण्यासाठी वापरण्यात येत असलेले साधन वगळून). परंतु यामध्ये रोड-रोलरचा अंतर्भाव होत नाही;
४५) वाहतूक चिन्हे यामध्ये, सर्व संकेतचिन्हे, इशारा चिन्ह खांब, दिशानिदेशन खांब, रस्त्यांवरी चिन्हांकने मोटार वाहनांच्या चालकांच्या माहितीसाठी मार्गदर्शनासाठी किंवा दिशा निदेशानासाठी असलेली इतर चिन्हे यांचा समावेश होतो;
४६) ट्रेलर म्हणजे, मोटार वाहनाद्वारे ओढले जाणारे किंवा काढून नेते जाण्यासाठी उद्देशित असलेले निम-ट्रेलर व साईड कार यांव्यतिरिक्त अन्य कोणतेही वाहन;
४७) परिवहन वाहन म्हणजे, सार्वजनिक सेवा वाहन, मालमोटार, शैक्षणिक संस्था बस किंवा खाजगी सेवा वाहन;
४८) भारविरहित वजन म्हणजे, वाहनाचे किंवा ट्रेलरचे ते वापरात असताना त्या वाहनाबरोबर किंवा ट्रेलरबरोरब सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनसामग्रीसह वजन. मात्र यामध्ये चालकाचे किंवा परिचराचे वजन अंतर्भूत नाही, आणि जेव्हा पर्यायी भागांचा किंवा सांगाड्यांचा वापर करण्यात येतो तेव्हा वाहनाचे भारविरहित वजन म्हणजे, अशा सर्वांत जास्त वजनाच्या भागाच्या किंवा सांगाड्याच्या वजनासह वाहनाचे वजन;
४९) वजन म्हणजे, वाहनाच्या चाकांद्वारे ते वाहन ज्या पृष्ठभागावर उभे असेल त्यावर १६.(गतीमान होते) त्या वेळी पारेषित केले जाणारे एकून वजन.
————
१. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (एक) द्वारा खंड (१) च्या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (दोन) द्वारा खंड ४ नंतर समाविष्ट करण्यात आले.
३. १९९४ चा अधिनिमय क्रं. ५४, कलम २ द्वारे वगळण्यात आले (१४-११-१९९४ पासून)
४. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (तीन) द्वारा खंड ९ नंतर समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (चार) द्वारा खंड १२ नंतर समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (पाच) द्वारे वगळण्यात आले.
७. १९९४ चा अधिनिमय क्रं. ५४, कलम २ द्वारे ६००० या अकांऐवजी (१४-११-१९९४ पासून) समाविष्ट करण्यात आले.
८. १९९४ चा अधिनिमय क्रं. ५४, कलम २ द्वारे (१४-११-१९९४ पासून) समाविष्ट करण्यात आले.
९. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (सहा) द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
१०. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (सात) द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
११. १९९४ के अधिनियम सं. ५४ की कलम २ द्वारा पस्तीस घन सेंटीमीटर या शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१२. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (आठ) द्वारा खंड ३८ नंतर समाविष्ट करण्यात आले.
१३. १९९४ के अधिनियम सं. ५४ की कलम २ द्वारा (१४-११-१९९४ पासून) समाविष्ट करण्यात आले.
१४. १९९४ के अधिनियम सं. ५४ की कलम २ द्वारा (१४-११-१९९४ पासून) समाविष्ट करण्यात आले.
१५. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (नऊ) द्वारा खंड ४२ नंतर समाविष्ट करण्यात आले.
१६. २०१९ चा अधिनियम क्रं. ३२ चे कलम २ (दहा) द्वारा खंड ४९ मध्ये बदली समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply