मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २७ :
केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
केन्द्र शासनाला पुढील बाबींसंबंधात नियम करता येतील :-
(a)क) १.(अ) कलम २अ च्या पोटकलम (२) खाली ई-कार्ट (गाडी) आणि ई-रिक्षा यासंबंधित तपशिल (वैशिष्ट्ये);)
(aa)कक) २.(अअ) कलम ३ च्या पोटकलम (२) मध्ये निर्देशिलेल्या शर्ती;
(b)ख) ब) ज्या नमुन्यात शिकाऊ व्यक्ति लायसनसाठी अर्ज करता येईल तो नमुना व त्यात अंतर्भूत करावयाची माहिती आणि कलम ८ च्या पोटकलम (२) मध्ये निर्देशिलेल्या अर्जासह सादर करावयाचे दस्तऐवजी यांबाबत उपबंध करणे;
(c)ग) क) कलम ८ च्या पोटकलम (३) मध्ये निर्देशिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या नमुन्याबाबत उपबंध करणे;
(d)घ) ड) कलम ८ च्या पोटकलम (५) मध्ये निर्देशिलेल्या चाचणीच्या तपशीलाबाबत उपबंध करणे;
(da)घक) ३.(डअ) असा नमुना आणि पद्धत, ज्यामध्ये लायसन प्राधिकरण कलम ८ च्या पोटकलम (६) खाली शिकाऊ लायसन देऊ शकेल;
(db)घख) डब) कलम ८ च्या पोटकलम (६) चे तिसरे परंतुकान्वये लायसन प्राधिकरणाने अर्जदाराची ओळख तपासून पाहण्याची दिलेली पद्धत;)
(e)ड) ई) ज्या नमुन्यात चालकाच्या लायसनसाठी अर्ज करता येईल तो नमुना व त्यात अंतर्भूत करावयाची माहिती आणि कलम ९ याच्या पोटकलम (२) मध्ये निर्देशिलेल्या अर्जासह सादर करावयाच्या दस्तऐवजांबाबत उपबंध करणे;
(f)च) फ) कलम ९ च्या पोटकलम (३) मध्ये निर्देशिलेल्या वाहन चालविवण्याच्या क्षमता-चाचणीच्या संबंधातील तपशिलाबाबत उपबंध करणे;
(ff)चच) १.(फफ) अशी पद्धत आणि अटी यांना अधीन राहून, कलम ९ च्या पोटकलम (१०) खाली चालविण्याचे लायसन दिले जाईल.)
(g)छ) ग) या अधिनियमान्वये ज्या व्यक्तींना परिवहन वाहने चालविण्याकरिता लायसन द्यावयाचे त्या व्यक्तींची किमान शैक्षणिक अर्हता आणि अशा व्यक्तीने ज्या मुदतीत अशी अर्हता प्राप्त करावयाची ती मुदत विनिर्दिष्ट करणे;
(h)ज) ह) कलम १० च्या पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या लायसनांचा नमुना व त्यातील मजकूर याबाबत उपबंध करणे;
(i)झ) आय) कलम ११ च्या पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या अर्जाचा नमुना व त्यातील मजकूर आणि अर्जासोबत सादर करावयाचे दस्तऐवज व त्याबाबत आकारावयाची फी याबाबत उपबंध करणे;
(j)ञ) जे) कलम ११ खाली करण्यात आलेल्या अर्जाला, ज्या शर्तींच्या अधीनतेने कलम ९ लागू होईल त्या शर्तीबाबत उपबंध करणे;
(ja)ञक) ४.(जेअ) प्रक्षिक्षण मॉड्यूलचा अभ्यासक्रम आणि कलम १२ च्या पोटकलम ६ खाली शाळा आणि संस्ता यांचे विनियमन;
(jb)ञख) जेब) कलम १४ च्या पोटकलम (२) मधील खंड (अ) आणि (ब) अन्वये धोकादायक किंवां असुरक्षित पद्धतीचा माल वाहतूक करणाऱ्या अन्य मोटर वाहनांचे चालविण्याचे लायसनच्या नूतनीकरणाच्या अटी;
(jc)ञग) जेक) कलम ११ च्या पोटकलम (२) चे तिसरे परंतुकान्वये लायसन प्राधिकरणाने अर्जदाराची ओळख तपासून पाहण्याची दिलेली पद्धत;)
(k)ट) के) कलम १५ च्या पोटकलम (१) मध्ये निर्देशिलेल्या अर्जाचा नमुना व त्यातील मजकूर याबाबत आणि कलम १५ याच्या पोटकलम (२) खालील अशा अर्जासोबतचे दस्तऐवज याबाबत उपबंध करणे;
(l)ठ) एल) कलम १८ च्या पोटकलम (१) खाली लायसन देणाऱ्या प्राधिकरणाबाबत उपबंध करणे;
(m)ड) एम) शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्यासाठी, चालकाचे लायसन देण्यासाठी व त्याच्या नुतनीकरणासाठी आणि मोटार वाहने चालविण्याचे शिक्षण देणाऱ्या शाळा किंवा आस्थापना यांचे नियमन करण्याच्या प्रयोजनासाठी असलेली लायसने देण्यासाठी कलम ८ च्या पोटकलम (२), कलम ९ च्या पोटकलम (२) आणि कलम १५ ची पोटकलमे (३) व (४) यांखाली देय असलेली फी विनिर्दिष्ट करणे;
(n)ढ) एन) कलम १९ च्या पोटकलम (१) च्या खंड (फ (एफ)) च्या प्रयोजनासाठी कृती विनिर्दिष्ट करणे;
(na)ढक) ५.(एनअ) कलम १९ च्या पोटकलम (१अ) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे लायसनधारकाचे नाव पब्लिक डोमेन (सार्वजनिक ठिकाणी) मध्ये प्रसारित करण्याची पद्धत;
(nb)ढख) एनब) कलम १९ च्या पोटकलम (२ब) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे चालकाच्या रिफ्रेशर (पुनश्चर्या) प्रशिक्षण अभ्यासक्रमाची पद्धत, अध्ययन कार्यक्रम आणि कालावधी यांचे उपबंध करणे;)
(o)ण) ओ) कलम २४ च्या पोटकलम (२) च्या प्रयोजनासाठी या अधिनियमाखालील अपराध विनिर्दिष्ट करणे;
(oa)णक) ६.(ओअ) कलम २५अ मध्ये विनिर्दिष्ट केलेले सर्व किंवा कोणतेही विषय;)
(p)त) पी) कलम २६, ७.(***) मध्ये निर्देशिलेल्या सर्व किंवा कोणत्याही बाबींच्या संबंधात उपबंध करणे;
(q)थ) क्यू) केन्द्र शासनाकडून विहित करण्यात यावयाची किंवा करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब.
———————–
१. २०१५ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१५ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ५ अन्वये पुन:संख्यांकित करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
७. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १४ अन्वये वगळण्यात आले.