मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २६ :
१.(चालकाच्या लायसनची राज्य रजिस्टर (नोंदवही) ठेवणे :
प्रत्येक राज्यशासन हे, केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, राज्य शासनाच्या लायसन प्राधिकरणाने दिलेल्या व नूतनीकरणे केलेल्या चालकाच्या लायसन संबंधात, चालकाच्या लायसनची राज्य रजिस्टर (नोंदवही) ठेवेल, ज्यामध्ये निम्नलिखित तपशीलाचा अंतर्भावर असेल :-
(a)क) अ) चालकाचे लायसन धारकांची नावे व पत्ते ;
(b)ख) ब) लायसन क्रमांक;
(c)ग) क) लायसन दिल्याची किंवा त्याच्या नूतनीकरणाची तारीख;
(d)घ) ड) लायसन समाप्तीची तारीख;
(e)ड) इ) ज्या वर्गाची आणि प्रकारची वाहने चालविण्यास अधिकृत करण्यात येईल त्या वाहनांचे वर्ग व प्रकार;
(f)च) फ) केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल असा इतर तपशील.)
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १३ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.