मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१ :
विवक्षित बाबतीत चालकाचे लायसन निलंबित करणे :
१) कलम १८४ अन्वये शिक्षायोग्य असलेल्या अपराधासाठी जिला पूर्वी दोषी ठरविण्यात आले असेल अशा व्यक्तीच्या संबंधात, अशा व्यक्तीने सदर कलम १८४ मध्ये निर्दिष्ट करण्यात आले असेल असे कोणत्याही वर्गाच्या किंवा वर्णनाच्या मोटार वाहनाचे घातक चालन करून एका किंवा अधिक व्यक्तींच्या मृत्यूस ती कारण झाली आहे किंवा तिने त्यांना गंभीर स्वरूपाची इजा पोहोचवली आहे, अशा प्रकारचे आरोप करून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने प्रकरणाची नोंद केली असेल अशा बाबतीत, अशा व्यक्तीने धारण केलेले चालकाचे लायसन अशा वर्गाच्या आणि वर्णनाच्या मोटार वाहनाच्या बाबतीत-
(a)क) अ) असे प्रकरण नोंदविण्यात अल्याच्या तारखेपासून सहा महिन्याच्या कालावधीसाठी, किंवा
(b)ख) ब) उपरोक्त कलावधी समाप्त होण्यापूर्वी अशा व्यक्तीला सोडून देण्यात किंवा दोषयुक्त करण्यात आले असल्यास यथास्थिति, अशा सोडून देण्यापर्यंत किंवा दोषमुक्तीपर्यंत, निलंबित राहील,
२) एखाद्या व्यक्तीने धारण केलेले लायसन, पोट-कलम (१) च्या तरतुदींच्या आधारे निलंबित झाले असेल अशा बाबतीत पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले प्रकरण ज्याच्याकडून नोंदविण्यात आले असेल, अशा पोलीस अधिकाऱ्याने असे निलंबन, अशा अपराधांची दखल घेण्यासाठी सक्षम असणाऱ्या न्यायालयाच्या निदर्शनास आणले पाहिजे आणि त्यानंतर, अशा न्यायालयाने ते चालकाचे लायसन ताब्यात घेतले पाहिजे, अशा निलंबनाचे पृष्ठांकन त्याच्यावर केले पाहिजे आणि अशा प्रकारच्या निलंबनाची वस्तुस्थिती ज्या प्राधिकरणाने लायसन दिले असेल किंवा त्याचे शेवटी नवीकरण केले असेल त्याला कळवली पाहिजे.
३) पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या व्यक्तीला सोडण्यात किंवा दोषमुक्त करण्यात आले असेल, अशा बाबतीत, अशा चालकाच्या लायसनवर त्याच्या निलंबनाच्या संबंधात केलेले पृष्ठांकन अशा न्यायालयाने रद्द केले पाहिजे.
४) कोणत्याही विशिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाच्या मोटार वाहनाचे लायसन पोट-कलम (१) अन्वये निलंबित करण्यात आले असल्यास, चालकाचे लायसन निलंबित असेल तोपर्यंत, अशा विशिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याचे कोणतेही लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास अशा लायसनधारक व्यक्तीला बंदी असेल.